हातमाग उत्पादनाच्या विक्रीसाठी मुंबई विमानतळावर दालन- वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

सोलापुरातील हातमाग विणकरांचे उत्पादन विक्रीसाठी मुंबई येथील विमानतळावर कायमस्वरुपी दालन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिली.

अक्कलकोट एमआयडीसी येथील यंत्रमाग उत्पादक संघाच्या सभागृहात विभागीय हातमाग कापड स्पर्धा झाली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ वेळी ते बोलत होते. यावेळी उपसंचालक किरण सोनवणे, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, शहाजी पवार आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, हातमाग व्यवसायातील कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. कलात्मक आणि नाविन्यपूर्ण वाणाची उत्पादन करण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास मला वाटतो. सोलापुरातील कारागिरांनी आता आपल्या उत्पादनाची मुंबई, पुणे शहरात मार्केटिंग करायला हवे. यासाठी राज्य शासन आवश्यक मदत करण्यासाठी तयार आहे.