बालभारती करणार ब्रेल लिपीतही पुस्तके प्रकाशित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बालभारतीतर्फे पुढील वर्षापासून आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून ब्रेल लिपीत पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात येतील अशी घोषणा शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री अशिष शेलार यांनी आज वांद्रे येथील कार्यक्रमात केली.

नाशिक येथील दि ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन (इंडिया) या संस्थेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील गाईड तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशन आज वांद्रे येथील कार्यक्रमात शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी संस्थेसाठी एक ब्रेल प्रिंटर मिळावा अशी मागणी केली ही मागणी मान्य करताना त्यांनी पुढील वर्षापासून ब्रेल लिपीतील पाठ्यपुस्तके ही बालभारतीतर्फे उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती दिली.

आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार , नुकताच झालेल्या बालभारतीच्या बोर्डाच्या मिटिंग मध्ये घेण्यात आला आहे व त्याबाबतची पुढील कार्यवाही सुरू झाली आहे, असे सांगत पुढील शैक्षणिक वर्षापासून अंध विद्यार्थ्यांना त्यांची पाठ्य पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध होतील .

राज्यात अन्य भाषेतील आणि लिपीतील पाठ्यपुस्तके बालभारतीतर्फे प्रकाशित केली जातात त्याचप्रमाणे पुढील वर्षापासून ब्रेल लिपीतील पाठ्यपुस्तके ही बालभारतीतर्फे उपलब्ध करून देण्यात येतील.

काय आहे ब्रेल लिपी –

अंधत्व आल्यानंतर लुईस यांनी न हरता त्यांच्या नावानेच एक लिहण्याची पद्धत विकसित केली. ज्याच्यामध्ये सहा कोड होते. त्यालाच कालांतरांने ‘ब्रेल लिपी’ असे नाव मिळाले. ब्रेल लिपीवर पहिले पुस्तक १८२९ मध्ये प्रकाशित झाले.