Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा हॉटेलमधील मुक्काम वाढला?, ‘या’ तारखेपर्यंत हॉटेलचे बुकिंग बंद

गुवाहाटी : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | विधानसभा निकालानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केली. बंडखोर आमदारांवर 12 जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई करता येणार नसल्याचे (Maharashtra Political Crisis) सांगितले. परंतु, ठाकरे सरकारविरोधात (Thackeray Government) अविश्वास प्रस्ताव दाखव करण्यासाठी शिंदे गट महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. आता शिंदे गट (Eknath Shinde Group) कधी येणार याचीच शिवसेनेसह (Shivsena) अनेकजण वाट पाहत आहेत.

 

शिंदे गटाने कालच 28 जून पर्यंत असलेले ब्लू रेडिसन हॉटेलचे (Radisson Blu Hotel Guwahati) बुकिंग दोन दिवसांनी वाढवले होते. म्हणजे हे बुकिंग 30 जूनपर्यंत करण्यात आले होते. आता याच हॉटेलच्या वेबसाईटवरुन महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आधी 30 जून पर्यंत सामान्यांसाठी बुकिंग बंद ठेवण्यात आले होते. ते आता 5 जुलैपर्यंत पुन्हा बंद ठेवण्यात आले आहे.

सामान्य नागरिक या हॉटेलमध्ये 6 जुलैपासून बुकिंग करु शकतात.
एकनाथ शिंदे गट या हॉटेलमध्ये राहण्यास आल्यापासून हॉटेल प्रशासनाने बुकिंग बंद (Booking Closed) केले होते.
या हॉटेलमध्ये शिंदे गटाचे आमदार, कार्यकर्ते आणि आधीपासून ज्यांचे बुकिंग होते त्यांनाच प्रवेश दिला जात होता.
सुरुवातीला 28 जूनपर्यंत बुकिंग बंद करण्यात आले होते. मात्र कालपासून ते 30 जून पर्यंत बंद केले होते.
आता 5 जुलै पर्यंत बुकिंग बंद केले आहे. बुकिंग करण्याचा प्रयत्न केल्यास हॉटेलमध्ये रुम उपलब्ध नसल्याचा मेसेज येत आहे.
तसेच दुसऱ्या तारखा निवडण्यास सांगितले जात आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | when will the shivsena leader eknath shinde rebel shivsena mlas group return extend till 5th july radisson blu website shows no booking available

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या ‘फुटी’ मागील खरे कारण पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समोर येणार?

 

Maharashtra Political Crisis | ’11 जुलैपर्यंत अधिवेशन बोलावून अविश्वास ठराव आणता येणार नाही’ – घटनातज्ज्ञ

 

Pune PMC News | मिळकत कराची थकबाकी असलेल्या 121 मिळकती दिवसभरात सील; 24 मिळकत धारकांनी तातडीने भरले 45 लाख रुपये