4 कंपन्यांचे मालक, गिनीज बुकमध्ये नाव, मुंबईमधून इंदूर येथे येऊन तरुण व्यावसायिकाने केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   वयाच्या 31 व्या वर्षी 4 कंपन्यांचे मालक आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणाऱ्या मुंबई येथील तरूण व्यावसायिकाने दोन दिवसांपूर्वी असे भयानक पाऊल उचलले यावर लवकरच कोणालाही विश्वास बसणार नाही. या तरुण व्यावसायिकाने लग्नासाठी मुंबईहून इंदूर येथे येऊन हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि एक सुसाइड नोट सापडली ज्यात एका मुलीच्या नावाचा उल्लेख असून त्यात एक कोटी रुपये असल्याची गोष्ट नमूद केली आहे.

मुंबईचा तरूण व्यावसायिक पंकज कांबळे यांना सगळेच ओळखतात. वयाच्या 31 व्या वर्षी पंकज कांबळे यांनी चार कंपन्या उभ्या करुन व्यवसाय जगात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली. पंकज इंदूर येथे एका लग्नात सहभागी होण्यासाठी ते आले होते. तेथील एका हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली. सुरुवातीच्या तपासात पोलिसांना हे प्रकरण प्रेमसंबंध असल्याचे वाटत आहे.

मात्र एएसपी राजेशसिंग रघुवंशी यांनी हे प्रेमप्रकरणाशी संबंधित आणि घटनास्थळावर कोणतीही सुसाइड नोट आढळल्याचे नाकारले आहे. पोलिसांना सुसाइड नोट मिळाल्याचे हॉटेलमध्ये उपस्थित लोकांचे म्हणणे आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंकज कांबळे यांच्या खोलीतून सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये नीलम नावाच्या मुलीचा उल्लेख आहे. त्याच वेळी, आय लव्ह यू नीलम डायरीत लिहिलेले आहे. इतकेच नाही तर सुसाईड नोटमध्ये एक कोटी रुपये असल्याची गोष्ट ही सांगितली आहे. पंकज कांबळे यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून ते मुंबईला इंदूरला रवाना झाले आहेत.