कार्डक्लोनिंगद्वारे ६४ जणांवर आॅनलाईन दरोडा

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन

पुण्यातील काॅसमाॅस बॅंकेच्या सर्व्हरमधून डेबिट कार्डधारकांची माहिती चोरुन त्याद्वारे बॅंकेची तब्बल 94 कोटी रुपयांची रक्कम चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच, मुंबईमध्ये कार्डांचे क्लोनिंग करुन 64 जणांवर आॅनलाईन दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. हाॅटेल व ढाब्यांवरील कर्मचाऱ्यांकडूनच ही लूट करण्यात आली आहे.

मुलुंडमधील एका तरुणाच्या डेबिट कार्डद्वारे कर्नाटकातून 24 हजार रुपये काढण्यात आले. त्यावेळी हा प्रकार समोर आला. त्याचे कार्ड असलेल्या बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडे पोलिसांनी चाैकशी केली. त्यावेळी एचडीएफसी बॅंकेच्या 64 ग्राहकांनीही अशा प्रकारच्या तक्रारी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील बहुतांश लोकांनी मुंबईतील सुनील हाॅटेल प्रायव्हेट लिमिटेड,अपना ढाबा, अर्बन तडका, रेन फॉरेस्ट या हॉटेलांमध्ये बिल भरण्यासाठी कार्डचा वापर केल्याचे निदर्शनास आले. या हॉटेलांमध्ये काही दिवस काम करणारा एक कर्मचारी छत्तीसगडमध्ये असल्याचे समजल्यानंतर तेथून धनेश उर्फ करण टंडन याला तसेच कर्नाटकातून इतरांना ताब्यात घेतलं आहे.
[amazon_link asins=’B078LVWLJX,B07C2ZW7ZB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’37efb6c5-a137-11e8-a829-13ded16b3323′]