‘राफेल प्रकरणाला भ्रष्टाचाराची दुर्गंधी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या देशात सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे असे सांगत, आपल्या देशाचे संरक्षण खाते त्यात आघाडीवर आहे. राफेल लढाऊ विमान खरेदीतील संशयास्पद व्यवहारांवरून ही बाब अधोरेखित होते असे वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी केले आहे. एन. राम हे ‘मुंबई कलेक्टिव्ह’ मधील ‘राफेल : मोदी नेमेसिस?’ या विषयावरील आयोजित केलेल्या परिसंवादात बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुंबईतील नरिमन पाॅईंट येथे असणाऱ्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रविवारी परिसंवाद पार पडला. यावेळी या परिसंवादात एन. राम यांनी राफेल प्रकरणावर आपलं मत मांडलं. यावेळी बोलताना त्यांनी राफेल खरेदीबाबत ‘दसाॅल्टशी’ करार करताना समांतर वाटाघाटी करण्यात आल्या असे एन. राम म्हणाले.

पुढे बोलताना एन. राम म्हणाले की, “करारातील भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदी जाणूनबुजून काढण्यात आल्या. राफेलमध्ये सरकारचा व्यवहार एका खासगी कंपनीशी करण्यात येत होता. असं असताना भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदी काढण्याचे कारण काय ?” असे म्हणत त्यांनी सवाल उपस्थित केला. इतकेच नाही तर, राफेल विमान खरेदी प्रकरणाला भ्रष्टाचाराची दुर्गंधी येते असेही राम यावेळी म्हणाले.

ह्याहि बातम्या वाचा

Air Strike : ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा अखेर उघड नक्की किती अतिरेक्यांचा झाला खात्मा हे वाचा सविस्तर

शरद पवार माघार घेणार हे मला आधीच माहित होते : महादेव जानकर

राज ठाकरेंना मी पढवलं…! ठीक आहे, बारामतीची परंपराच : शरद पवार

नगर राष्ट्रवादीकडेच पवारांचा पुनरुच्चार

मावळमधून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब