Mumbai Crime | फटाके फोडण्याच्या वादातून 3 अल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खुन, गोवंडी परिसरातील धक्कादायक घटना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | काचेच्या बॉटलमध्ये फटाके फोडण्यास विरोध केल्याने तीन अल्पवयीन मुलांनी 21 वर्षाच्या तरुणाचा खुन (Murder In Mumbai) केल्याची घटना गोवंडी भागात घडली आहे. ही घटना (Mumbai Crime) सोमवारी (दि. 24 ऑक्टोबर) रोजी गोवंडीच्या नटवर पारिया कंम्पाऊंड मधील म्हाडा वसाहतीत इमारत क्रमांक 15 येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी (Mumbai Police) तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

सोमवारी (दि. 24 ऑक्टोबर) रोजी गोवंडीच्या नटवर पारिया कंम्पाऊंड मधील म्हाडा वसाहतीत इमारत क्रमांक 15 च्या कोपऱ्यात 3 अल्पवयीन मुले काचेच्या बॉटलमध्ये रॉकेट उडवत होते. यावेळी त्यांना सुनील उर्फ शंकर चंद्रशेखर नायडू Sunil Chandrashekar Naidu (वय 21) याने काचेच्या बॉटलमध्ये फटाके (रॉकेट) उडवू नका, असे सांगितले. याचा राग तिघांना आला आणि त्यांच्यात शाब्दिक (Mumbai Crime) वाद झाले. या वादाचे रुपांतर मारामारीत होऊन तिघांपैकी एकाने चाकू काढत तो सुनीलच्या मानेत घुसवला आणि तिथून पळ काढला.
सुनील जखमी अवस्थेत त्या मुलांच्या मागे लागला. पण ते सापडले नाहीत.

सुनीलच्या मानेतून रक्तस्त्राव सुरु होता. त्यावेळी त्याला त्याच्या नातेवाईकांनी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात
(Rajawadi Hospital) नेले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शिवाजी नगर (Shivaji Nagar Police) पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांवरही आयपीसी 302, 34 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा
(Maharashtra Police Act) 37 (1) (अ) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Web Title :- Mumbai Crime | 3 minors killed a youth due to a dispute over bursting firecrackers, a shocking incident in Govandi area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘…तेव्हाच मला राग येतो’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं

Pune Crime | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून वारजे माळवाडी परिसरात संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळीवर मोक्का

Pune Crime | एसटी प्रवासात कुरिअर बॉयचे 24 लाख लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक