Mumbai Crime | ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची डॉक्टर तरुणीला धमकी, बीएमसीच्या MBBS डॉक्टरला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | सहकारी महिलेचे फोटो मॉर्फ (Photo Morph) करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी (Threat) देणाऱ्या मुंबई महापालिकेतील (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) एका एमबीबीएस डॉक्टरला (MBBS Doctor Arrest) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडित महिला डॉक्टरच्या जबाबानंतर दिंडोशी पोलिसांनी (Mumbai Police) 27 वर्षीय डॉक्टरवर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करुन अटक केली. सुशांत कदम (Dr. Sushant Kadam) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरचे (Mumbai Crime) नाव आहे.

आरोपी डॉ. सुशांत कदम याच्यावर दिंडोशी पोलीस ठाण्यात (Dindoshi Police Station) आयपीसी 354 (अ), 500, 504, 506, 509 आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीच्या तक्ररीनंतर पोलिसांनी आरोपीला त्याच्या संतोष नगर येथील क्लिनिकमधून अटक (Mumbai Crime) केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात (Senior Police Inspector Jeevan Kharat)
यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. सुशांत कदम हा महिला डॉक्टरसोबत अनेक दिवसांपासून गैरवर्तन
करत होता. दोघेही मालाड बीएमसी पी नॉर्थ विभागात काम करत होते.
आरोपीच्या सततच्या त्रासाला वैतागून महिलेने पोलिसांत तक्रार दिली.
यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. पुढील तपास दिंडोशी पोलीस करीत आहेत.

Web Title :- Mumbai Crime | mumbai bmc mbbs doctor arrested for threatening lady to post morphed photos on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ मागणीला योगी आदित्यनाथ यांची तत्वत: मान्यता, दिले अयोध्या भेटीचे आमंत्रण

Uddhav Thackeray | नाशिकमधील ठाकरे गटाची गळती थांबविण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात…