Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये धाड टाकत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. येथून पोलिसांनी देहव्यापारात अडकलेल्या ८ मॉडल्सना मुक्त केल असून, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. हे हॉटेल मुंबईच्या पश्चिमी उपनगरातील जुहू बीचजवळ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सेक्स रॅकेट बॉलिवूडचा एका कास्टिंग डायरेक्टर आणि सिनेमा निर्माता चालवत होता. सिनेमात काम मिळवण्याचे आमिष देऊन तो मॉडेल आणि अभिनेत्रींना देहव्यापारात ढकलायचा.

याबाबत मुंबई गुन्हे शाखेच्या CIU चे एपीआई सचिन कदम म्हणाले, प्रेम नामक कास्टिंग दिग्दर्शक आणि सिनेमा निर्माता मॉडेलिंग आणि स्ट्रगल करणाऱ्या अभिनेत्रींना पहिले आपल्या जाळ्यात अडकवायचा आणि त्यांना ब्लॅकमेल करुन वेश्याव्यवसायात जाण्यास भाग पाडायचा, अशी गप्त माहिती मिळाली होती. त्याद्वारेच पोलिसांनी धाड टाकून या महिलांना सोडवले.

वेश्याव्यवसाय ग्राहकांना अनेक वेबसाईटच्या माध्यमातून बोलवले जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापाला रचून बनावट ग्राहक बनत प्रेमच्या खात्यात दोन लाख रुपये जमा केले. त्यानंतर १९ जानेवारीला जुहूच्या रमाडा प्लाझा हॉटेलमध्ये सामाजिक सेवा शाखेच्या CIU ने सापाला रचला आणि प्रेमसह दोन महिलांना पकडले.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली एक महिला कोलकात्याची आहे. तिलाही अभिनेत्री बनवण्याच्या नावावर या सेक्स रॅकेटमध्ये ओढण्यात आलं होतं. या तिघांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरुन ८ तरुणींना वाचवलं. यापैकी काही तरुणींनी मॉडलिंग, वेब सिरीज आणि सीरिअलचे काही असायन्मेंट केले होते. आरोपी त्यांना काम देण्याचं आमिष देऊन आधी कॉम्प्रमाईज करण्यास सांगायचा.

दरम्यान, पोलिसांनी प्रेम आणि अन्य दोन महिलांविरुद्ध मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात कलम १२० बी, ३७० ३४ सह अवैध तस्करी कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. आरोपींकडून ५ लाख ५९ हजार रुपयांची रोख रक्कम आणि १५ स्मार्टफोन आणि एक डस्टर कर जप्त केली आहे. त्याशिवाय, तीन अशा लोकांना अटक करण्यात आली आहे, जे तरुणींना भुरळ पाडून वेश्याव्यवसायात ढकलायचे.