Mumbai Indians | मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! ‘हा’ वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

पोलीसनामा ऑनलाईन : Mumbai Indians | आयपीएल 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरूवात होणार आहे. हा आयपीएलचा 16 वा सिझन आहे. हा सिझन सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सला संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनला आयपीएलमधून बाहेर पडला आहे. हॅमस्ट्रिंग मधून सावरण्यासाठी त्याच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच तो ऍशेस मालिकेलादेखील मुकण्याची शक्यता आहे. (Mumbai Indians)

मागच्या आठवड्यात क्लब क्रिकेट खेळताना रिचर्डसनला पुन्हा दुखापत झाली. याअगोदर त्याला बीबीएलमध्ये दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला भारतातील एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले होते. तो यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार होता. त्याला मुबईच्या संघाने लिलावात दीड कोटींना विकत घेतले होते. तो मागच्या सिझनमध्ये पंजाब किंग्जच्या संघाकडून खेळला होता. यामुळे मुबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण मुंबईचा हुकमी एक्का वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहदेखील दुखापतीमुळे या सिझनमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता मुंबई इंडियन्स या दोघांच्या जागी कोणाला संधी देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Mumbai Indians)

रिचर्डसन मागच्या बऱ्याच काळापासून दुखापतीशी झुंज देत आहे. 2019 मध्ये खांद्यावर झालेल्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर तो त्या वर्षीचा एकदिवसीय विश्वचषक आणि ऍशेसमधून बाहेर पडला होता.
यानंतर त्याने डिसेंबर 2021 मध्ये अ‍ॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीमध्ये पुनरागमान केले व 5
विकेटदेखील घेतल्या. यानंतर त्याच्या टाचेच्या दुखापतीने त्याला पुढील सामन्यातून बाहेर व्हावे लागले.
त्यानंतर अजूनपर्यंत त्याने संघात पुनरागनमन केले नाही. “आम्ही सर्वजण झायबद्दल समजू शकतो.
तो लवकर बरा होईल अशी आम्हाला आशा आहे. आम्ही त्याला तिथून परत आणू शकतो.
कारण त्याचे 12 महिने कठीण गेले आहेत.” असे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अ‍ॅडम व्होगेस म्हणाले आहेत.

Web Title : Mumbai Indians | mumbai indians team has suffered a major shock as jhye-richardson has been rulled out from the ipl 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Palghar Crime News | चुलत भावाच्या हळदीला आलेल्या पाहुण्यांना घरी सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

Satara Crime News | येणपेमध्ये रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

ED Arrest Vinay Aranha | पुण्यातील नामांकित रोझरी स्कूलचे संचालक विनय आर्‍हानाला ईडीकडून अटक; 20 मार्चपर्यंत ईडीची कोठडी