प्रेमिकेच्या पतीला ‘गोत्यात’ आणण्यासाठी त्याने केले ‘असे’ काही ; त्याचा ‘कारनामा’ ऐकून व्हाल थक्‍क !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनल्समध्ये यार्डात उभ्या असलेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकं ठेवणाऱ्या आरोपीला टिळक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आनंद वानखेडे असं या तरुणाचे नाव असून त्याने प्रेमसंबंधातून प्रेयसीच्या पतीला फसवण्यासाठी हा बनाव केल्याची माहिती समोर आली आहे. शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकं ठेवल्याप्रकरणी अकोल्यातून आरोपीला अटक करण्यात आली होती.  मुंबईत शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्या सापडल्यानं बुधवारी खळबळ उडाली होती. लोकमान्य टिळक टर्मिनल्स येथे कारशेडमध्ये उभ्या एक्स्प्रेसमध्ये सफाई सुरु असताना या कांड्या सापडल्या होत्या. बॉम्बशोधक पथकाकडून स्फोटकाला पुष्टी मिळाली होती. त्यानंतर ही स्फोटकं निकामी करण्यात आली.

त्याचबरोबर या स्फोटकांसोबतच भाजप सरकारविरोधात काही पत्रही सापडली होती. त्यामुळे पोलिस या प्रकरणाचा तपास दहशतवादी  हल्ल्याच्या दिशेने करत होते, मात्र या प्रकरणात वेगळीच माहिती समोर अली आहे. हि स्फोटके  ठेवणाऱ्या आनंद वानखेडे या तरुणाने आपल्या प्रेयसीच्या पतीला अडकवण्यासाठी  रेल्वेत ठेवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता या घटनेचे सत्य बाहेर आले आहे. लग्नानंतर देखील प्रेयसीने संबंध ठेवावेत म्हणून आरोपी तिच्या मागे लागला होता. मात्र प्रेयसीने यासाठी नकार दिला. मात्र याने हार न मानता प्रेयसीच्या पतीला दहशतवादी गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्याने  कट रचला आणि हि स्फोटके शालिमार एक्सप्रेसमध्ये ठेऊन त्याला या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन केला.

मात्र आता तपासात याचा उलगडा झाला असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र सुरक्षा यंत्रणा त्याचप्रमाणे सामान्य माणसाच्या देखील  जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृत प्रवृत्तीच्या माणसाला कडक शिक्षा मिळाल्याशिवाय  समाजात चांगला संदेश जाणार नाही.