दारूपार्टी करून ‘डांगडिंग’ करणार्‍या 25 युवक-युवतींना मुंबईत अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शासनाकडून अनेक निर्बंध लादले जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, असे असतानाही काही लोक कोरोना नियमंचचे उल्लंघन करताना दिसत आहे. आपल्यामुळे इतरांचंही आयुष्य धोक्यात येईल याची जाण सुद्धा विसरत आहोत. अशीच एक घटना मुलुंड परिसरात घडली आहे. पोलिसांनी छापा टाकून हुक्का लाउंजमध्ये पार्टी करणाऱ्या २५ तरुण तरुणींना अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबईतील अनेक भागात पार्टी, दारु पार्टी, हुक्का यांसारखे प्रकार सुरूच आहेत. अटक करण्यात आलेल्यांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मुलुंडमधील एका पबमध्ये काही तरुण-तरुणी लॉकडाऊन असून देखील हुक्का आणि दारु पित होते. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या टीमने भूमरो नावाच्या एका पबवर छापा टाकला. त्यावेळी नाइट कर्फ्यू लावूनही पबमध्ये मुलं-मुलींना दारू, सिगरेट आणि हुक्का दिलं जात होतं असं निदर्शनास आले.