Mumbai News | मुंबईतील 3 रेल्वे स्टेशन आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी; प्रचंड खळबळ, सुरक्षा वाढवली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai News | मुंबई पोलिसांना (Mumbai Police) आलेल्या अज्ञात फोन कॉल (phone call) ने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. शुक्रवारी मुंबई पोलिसांना एक अज्ञात फोन आला होता ज्यामध्ये राज्यातील तीन प्रमुख रेल्वे स्टेशन आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात बॉम्ब ठेवल्याचे (bomb had been planted) सांगितले गेले. ही माहिती मिळताच मुंईतील ही तीन प्रमुख रेल्वे स्टेशन (Three major railway stations) आणि बॉलीवुड अभिनेता अमिताभ बच्चन (Bollywood Superstar Amitabh Bachchan) यांच्या बंगल्याची सुरक्षा वाढवली आहे.

दोघांना अटक
मात्र, तपासादरम्यान अद्याप काहीही संशयास्पद सापडलेले नाही. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या CIU यूनिटने राजू कांगने आणि रमेश शिरसाठ यांना अटक केली आहे. सध्या अटक आरोपींची चौकशी सुरू आहे.

नियंत्रण कक्षात आला फोन
पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात शुक्रवारी रात्री फोन आला, ज्यामध्ये फोन करणार्‍या व्यक्तीने म्हटले की, बॉम्ब छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी), भायखळा, दादर रेल्वे स्टेशन आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्यात ठेवले आहेत.

 

शोध अभियान सुरू

त्यांनी सांगितले की, कॉल आल्यानंतर रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड, डॉग स्क्वॉड आणि स्थानिक पोलीस कर्मचार्‍यांसोबत या ठिकाणी पोहचले आणि शोध अभियान सुरू करण्यात आले. परंतु, या ठिकाणी आतापर्यंत काहीही संशयास्पद मिळालेले नाही, सध्या तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

फोन स्विच ऑफ केला
माहितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी ताबडतोब त्या नंबरवर संपर्क केला, ज्यावरून कॉल आला होता.
परंतु दुसर्‍यांदा फोन करणार्‍या व्यक्तीने म्हटले की, मला आता त्रास देऊ नका आणि फोन बंद केला.
यानंतर त्या व्यक्तीशी संपर्क झाला नाही. संशयिताने फोन स्विच ऑफ केला होता.

तात्काळ चारही ठिकाणी शोध अभियान
अज्ञात फोनवरून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ चारही महत्वाच्या ठिकाणी शोध अभियान सुरू केले होते.
संबंधित ठिकाणांवर बॉम्ब विरोधी पथकांना तैनात करण्यात आले आहे.
मागील काही तासांपासून शोध अभियान सुरू आहे आणि अजूनपर्यंत कोणतेही संशयास्पद साहित्य सापडलेले नाही.
मुंबई पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी शोध अभियानावर लक्ष ठेवून आहेत.

Web Title :- Mumbai News | calls about bombs at 3 railway stations in mumbai and amitabh bachchans bungalow created panic security tightened

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Android यूजर्सने व्हावे सावध, तुमच्या फोनची स्क्रीन ‘रेकॉर्ड’ करतंय ‘हे’ अ‍ॅप; जाणून घ्या

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राचीही झाली 8 तास चौकशी

AK 47 | जम्मू काश्मीरमधील बडगाम येथील चकमकीत एक दहशतवादी ठार