जोगेश्वरीत ट्रक आणि कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर ५ जण जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र कालपासून पावसाने पुनरागमन करत जोर धराला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. आजच जोगेश्वरी येथील उड्डान पुलावर ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी अवस्थेत आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

जोगेश्वरी (पूर्व) येथील ट्रामा केअर हॉस्पिटलच्या विरूद्ध जोगेश्वरी उड्डान पुलावर ट्रक आणि कार यांच्यात विचित्र अपघात झाला. दोन्ही गाड्यांचे माेठे नुकसान झाले आहे. गाड्यांची अवस्था पाहुन हा अपघात नेमका कसा झाला असावा याचे तर्क लावले जात आहेत.

दरम्यान, या भीषण अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव अद्याप समजले नाही. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघातात चुक नेमकी कोणाची होती याचा तपास पोलीस करत आहेत.