ब्रेकिंग : अभिनेता आदित्य पांचोलीवर मुंबईत बलात्काराचा गुन्हा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता आणि निर्माता आदित्य पांचोलीवर मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन आदित्य पांचोलीवर या प्रकरणाची टांगती तलवार होती. अखेर मुंबई पोलिसांनी आज (गुरूवार) त्याच्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

आदित्य पांचोलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने बॉलिवूडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आदित्य पांचोलीची मुंबई पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासुन चौकशी चालु होती. त्यासंदर्भात पिडीतेचे जाब-जबाब देखील नोंदविण्यात आले होती. दोन-चार दिवसांपुर्वीच आदित्य पांचोलीवर लैंगिक शोषणाचे आरोप करणार्‍या अभिनेत्रीचे आणि तिच्या बहिणीचे जबाब पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले होते. त्यानंतर आज अखेर आदित्य पांचोली विरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्‍ताने अभिनेता नाना पाटेकरवर देखील गंभीर आरोप केले होते. त्याची सखोली चौकशी झाल्यानंतर नाना पाटेकर यांना क्‍लीन चीट देण्यात आली होती. ते प्रकरण होवुन काही दिवस होत नाहीत तोवर अभिनेता असलेल्या आदित्य पांचोलीविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने संपुर्ण बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
छातीत होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष नको , होऊ शकतो हा ‘आजार’
वजन कमी करण्यासाठी वेगन डाएट ला अनेकांची पसंती
चेहऱ्यावर काळे डाग आहेत का ? हे घरगुती रामबाण उपाय करा
डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे