मराठी माणसांसाठी लढणाऱ्या नितीन नांदगावकरला पोलिसांची नोटीस 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारा मनसे सैनिक नितीन नांदगावकर गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत आले आहेत. मात्र त्यांचं हे चर्चेत येने त्यांना भोवले आहे. मनसे सैनिक नितीन नांदगावकर  यांच्यापासून मुंबईकरांच्या जीवाला धोका आहे. त्यांना अनेक जण भीत आहेत आहे म्हणत मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. तुमच्यावर झालेल्या आरोपांवर मत मांडा अन्यथा तुम्हला दोन वर्षांसाठी तडीपार करू.
मुंबई मध्ये भैय्या लोकांचे प्रमाण वाढत जात आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मराठी माणसांवर अन्याय होत आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्यांना लुटणारे रिक्षाचालक, मराठी माणसांची फसवणूक करणारे बिल्डर यांना स्वतःच्या मनसे पद्धतीने फाटकावतात. त्यांची ही मराठी मानसांसाठी केलेली फटकेबाजी सोशल मीडियावरून विशषेषतः फेसबुक लाईव्ह वरून प्रसिद्ध होत आहे. त्यांच्या या फेसबुक लाईव्हमुले त्यांची लोकप्रियता वाढली आहे. मात्र त्यांची ही वाढती लोकप्रियता त्यांनाच भोवल्याचे दिसून येत आहे. नांदगावकर यांच्यापासून मुंबईकरांच्या जीवाला धोका असून अनेक जण भयभीत झाले आहेत, तुमच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत आपले म्हणणे मांडा, अन्यथा मुंबईतून दोन वर्षांसाठी तडीपार करू अशी नोटीस बजावत इशाराही मुंबई पोलिसांनी दिला असल्याचे मनसे सैनिक नितीन नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मनसे सैनिक नितीन नांदगावकर यांनी ‘माझी भिती नेमकी कुणाला आहे? मुंबई पोलिस मला दोन वर्षांसाठी तडीपार करायला निघाले आहेत. जनतेने सांगावे मी कुठे चुकतोय ? असे म्हणत माझा हा अन्यायाविरुद्धचा लढा हा चालूच राहणार आहे. पोलिसांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत ते सर्व बिनबुडाचे आहेत. मराठी माणसाच्या न्यायासाठी मी लढतो आणि शेवटपर्यंत लढत राहणार. मी नेमका कुणाला नकोय हे स्पष्ट करावे’ असे स्पष्ट करत या संदर्भातील व्हीडिओ त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.
इतकेच नव्हे तर, नांदगावकर यांना दिलेल्या  नोटीसमध्ये पोलिसांनी काही गुप्त साक्षीदारांचे म्हणणे मांडले आहे. त्या साक्षिदाराने नांदगावकर हे दररोज रात्री टर्मिनस सबवेकडे येतात. त्या ठिकाणी रिक्षा चालकांकडून ५ ते १० रूपयांचा हफ्ता घेतात, असा आरोप त्यांच्यावर केला आहे. दरम्यान ‘मी कोणाकडूनही हफ्ता घेतलेला नाही आणि ५ ते १० रूपयांचा हफ्ता घेणे हे हास्यास्पद आहे. हे गुप्त साक्षीदार आहेत कोण?’ असा सवालही त्यांनी केला.

नांदगावकर यांच्यावर पोलिसांनी केलेले आरोप
पोलिसांनी नांदगावकर यांच्यावर ११ कलमे लावली आहेत.

नांदगावकर यांनी मेट्रोच्या कामात अडथळा आणत काम बंद पाडले
कुर्ला येथील भुयारी मार्गात गर्दुल्ल्याला मारहाण

नांदगावकर हे परप्रांतियांना मारहाण करतात, त्यामुळे सामान्य नागरिकांना धोका आहे, असा आरोप पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे, मनसे सैनिक नितीन नांदगावकर यांना बजावलेल्या नोटीस मुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत.