Pune Police MCOCA Action | खंडणी मागणाऱ्या मोहसिन उर्फ मोबा शेख व त्याच्या साथीदारावर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 88 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | मुलाला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन वारंवार खंडणी (Extortion Case) मागणाऱ्या मोहसिन उर्फ मोबा बडेसाब शेख (Mohsin alias Moba Badesab Shaikh) व त्याच्या साथीदारावर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 88 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) कायद्यान्वये कारवाई केली आहे.

फिर्यादी आणि आरोपी मोहसिन शेख हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. मोहसिन शेख याचा मुलगा आजारी असल्याने तो त्याला त्रास देत होता. तसेच रागाच्या भरात मारुन टाकण्याचे बोलल्याने फिर्य़ादी यानी मोहसिन याच्या मुलाला सांभाळण्यासाठी घेऊन गेले. त्यानंतर आरोपी मोहसिन याने एक लाखाची मागणी करुन पैसे दिले नाहीतर मुलाला मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यावेळी फिर्य़ादी यांनी त्याला काही पैसे दिले. यानंतर मोहसिन याने वारंवार पैशाची मागणी केली. तर त्याचा साथीदाराने फिर्य़ादी यांना पैशासाठी धमकी देऊन मानसिक त्रास दिला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) टोळी प्रमुख मोहसिन उर्फ मोबा बडेसाब शेख व मोईन काळु शेख यांच्यावर आयपीसी 386, 387, 504, 507, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

तपासादरम्यान मोहसिन शेख व त्याच्या साथीदाराने खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करणे, धाक दाखवून खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा आणून लोकसेवकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, हत्यारे जवळ बाळगणे, खुनाचा परावा नष्ट करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याने वेगवेगळ्या साथीदारांच्या मदतीने परिसरात दहशत निर्माण करुन, आर्थिक फायद्यासाठी व टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी गंभीर गुन्हे केले आहेत. (Pune Police MCOCA Action)

येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Sr PI Balkrishna Kadam) यांनी परिमंडळ- 4 पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, परिमंडळ- 4 पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे,
सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम,
पोलीस निरीक्षक गुन्हे कांचन जाधव (PI Kanchan Jadhav),
जयदिप गायकवाड, निगराणी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे (API Mahesh Lamkhade),
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे (PSI Dombale),
पोलीस अंमलदार सचिन माळी, सचिन शिंदे, देविदास वांढरे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : भांडणाच्या रागातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार, सराईत गुन्हेगारासह दोघांवर FIR

पुण्यात एसटी बसची दोन कारसह पाच दुचाकींना धडक, 8 वर्षाच्या मुलासह सहा जखमी; बस चालक पोलिसांच्या ताब्यात (Video)

Pune Crime News | हॉटेल शौर्यवाडासह शहरातील विविध भागात घरफोडी; साडेपाच लाखाचा मुद्देमाल चोरीला