Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघात 3 ठार तर 6 जण जखमी; सहा वाहने एकमेकांवर आदळली

पोलीसनामा ऑनलाइन –  Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर (Mumbai Pune Expressway) बोरघाटजवळ 6 वाहने एकमेकांवर आदळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. अपघात (Accident) इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघातात (Accident) तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांची आणि जखमींची नावे समजू अद्यापह शकली नाहीत.

अपघात (Accident) झाल्यानंतर पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कोंबडयांनी भरलेल्या ट्रकला एक कार धडकली.
यानंतर मागून येणारा एक भरधाव ट्रेलर कारला धडकला.
यामुळे कारचा पूर्णपणे चुराडा झाला.  या अपघातात (Accident) तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Mumbai Pune Expressway)
दरम्यान, घटनास्थळी महामार्ग पोलिसांचे (Highway Police) एक पथक पोहचले असून बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात (Accident) ट्रक चालकाचा दोष समोर येत असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे देखील वाचा

Post Office PPF | वर्षाला फक्त आणि फक्त 500 रुपयांनी सुरू करा आपलं अकाउंट, म्हातारपणात मिळवा पेन्शनचा ‘लाभ’, जाणून घ्या ‘या’ सरकारी स्कीमबाबत

Pune Crime | दुर्दैवी ! भाजीपाला विक्री करुन घरी परतणाऱ्या मायलेकरावर काळाचा घाला, कंटेनरखाली दबून दोघांचा मृत्यू

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : accident on mumbai pune expressway 3 died on the spot while six are injured incident near borghat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update