Mumbai Rains | मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत 

मुंबई (Mumbai Rains) : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Rains | मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत शनिवारी रात्री विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने (heavy rain) हजेरी लावली. यामुळे मुंबईकरांची चांगलीच झोपमोड झाली. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. तर नेहमीप्रमाणे हिंदमाता आणि सखल भागात पाणी साचण्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाने (heavy rain) हजेरी लावली.

हवामान विभागाने (Meteorological Department) मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार
पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज असून बोरिवली पूर्वेकडील
शांतीवन भागात दहिसर नदीने (Dahisar river) धोक्याची पातळी ओलांडली आहे. या भागात पूरस्थिती
निर्माण झाली असून पाण्याच्या प्रवाहामुळे वाहनेही वाहून जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

रेल्वे वाहतुकीवरही या पावसाचा परिणाम झाला आहे. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही (Kalyan-Mumbai local service) ठप्प झाली आहे. बाहेरून  येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल-सीएसएमटी हार्बर मार्गावरील (Panvel-CSMT Harbor Route) वाहतूकही ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. मध्य रेल्वेच्या सायन स्थानकात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी रेल्वे रुळांवर साचल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, कांदिवली पूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची झोपमोड झालीच.

पण संसार वाचवण्यासाठी धावपळही करावी लागल्याची माहिती मिळाली आहे. सायनच्या गांधी मार्केट परिसरात  पाणी साचले असून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.

गुरुवारी रात्रीपासूनच मुंबईत पावसाला सुरूवात झाली. तसेच  गेल्या चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढला आहे. गेले दोन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने झोडपून काढले.

हे देखील वाचा

Home Loan | होम लोन घेण्याची सुवर्णसंधी ! मिळवा 10 हजारपर्यंतचे गिफ्ट व्हाऊचर, ऑफर फक्त 22 जुलैपर्यंत

Blood platelets | कोरोनातून रिकव्हरीनंतर वेगाने कमी होतोय प्लेटलेट्सचा काऊंट, करू नका निष्काळजीपणा; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mumbai Rains | heavy rain lashes many parts mumbai and suburban

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update