Blood platelets | कोरोनातून रिकव्हरीनंतर वेगाने कमी होतोय प्लेटलेट्सचा काऊंट, करू नका निष्काळजीपणा; जाणून घ्या

नवी दिल्ली : कोणत्याही वायरल इन्फेक्शननंतर (viral infection symptoms) ब्लड प्लेटलेट्स (Blood platelets) कमी होणे सामान्य बाब आहे. बहुतांश प्रकरणात इन्फेक्शनमधून बरे झाल्यानंतर प्लेटलेट्स (Blood platelets) आपोआप सामान्य स्तरावर येतात. मात्र, Covid-19 च्या सर्व रूग्णांबाबत असे घडताना दिसत नाही. कोरोनाच्या काही रुग्णांमध्ये रिकव्हरीच्या अनेक आठवड्यापर्यंत ब्लड प्लेटलेट्स कमी आढळून येत आहेत.

ब्लड प्लेटलेट्स (Blood platelets)जेव्हा अनेक दिवसापर्यंत खुप असतात तेव्हा अशा स्थितीत मेडिकल हेल्पची आवश्यकता भासते. सर गंगा राम हॉस्पिटलचे सिनियर कन्सल्टंट डॉक्टर अतुल गोगिया यांनी इकॉनॉमिक्स टाइम्सला सांगितले, आम्ही अलिकडेच कोरोनातून रिकव्हर झालेली तीन अशी प्रकरणे पाहिली ज्यांचे ब्लड प्लेटलेट्स 10,000-20,000 च्या दरम्यान होते. हे खुप कमी आहेत.

डॉक्टर गोगिया यांनी सांगितले की, यापैकी 85 वर्षाच्या एका रूग्णाच्या प्लेटलेट्स 2,000 पर्यंत पोहचल्या होत्या आणि त्याच्या त्वचेतून रक्त वाहण्यास सुरू झाले होते. कमी ब्लड प्लेटलेट्सच्या या सर्व रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आणि स्टेरॉईड देण्याची आवश्यकता भासली होती.

दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिन डायरेक्टर डॉक्टर रोमेल टिक्कू यांनी सांगितले, सामान्य
प्लेटलेटची संख्या 1,50,000 ते 4,00,000 प्रति मायक्रोलीटर आहे. कोरोनातून रिकव्हर झालेल्या रूग्णांपैकी
जवळपास 20% लोकांची प्लेटलेट्स संख्या 1,00,000 ते 1,50,000 च्या दरम्यान आढळली जी कमी तर
आहे परंतु यामध्ये कोणत्याही वैद्यकीय मदतीची गरज भासत नाही.

जेव्हा प्लेटलेट्स काऊंट 50,000 किंवा यापेक्षा कमी होतो किंवा हिरड्या आणि नाकातून रक्त येत असेल तर ही चिंतेची बाब आहे. डांग लॅबचे संस्थापक आणि कन्सल्टंट मायक्रोबायोलॉजिस्ट डॉक्टर नवीन डांग यांनी म्हटले, अनेक रूग्णांमध्ये कोरोनातून रिकव्हरीनंतर अनेक आठवड्यानंतर ब्लड प्लेटलेट्स 1-1.5 लाख प्रति मायक्रोलीटरच्या स्तरावर राहात. ही घाबरण्याची बाब नाही.

हे देखील वाचा

Why Aamir Khan Divorced Kiran Rao | आमिर-किरण यांनी का घेतला घटस्फोट? जाणून घ्या कारण

Pimpri Crime | 1.5 कोटींची फसवणूक ! ‘पुणे पिपल्स’चा सेवानिवृत्त बँक मॅनेजर महेश केकंरे, विनोदकुमार जैन-पाटणी, प्रकाश गुजर, स्वप्नील राक्षेवर FIR दाखल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Blood platelets | coronavirus low blood platelets count symptoms health

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update