‘मुंबई सागा’तील यो यो हनी सिंहचे नवीन गाणे रिलीज, ‘शोर मचेगा’ वेगाने होतेय व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला होता, यात चित्रपटश्रुष्टीला देखील नुकसान सहन करावे लागले. दरम्यान सुधारत चाललेली परिस्थिती आणि कोरोना लस आल्यानंतर बंद असलेल्या थिएटर्सना 100 टक्के प्रेक्षकांच्या क्षमतेसह पुन्हा एकदा उघडले गेले आहेत. यामुळे गेल्या वर्षभरापासून रखडलेले अनेक चित्रपट एकामागून एक रिलीज होण्यास तयार आहेत. यात ‘मुंबई सागा’ या चित्रपटाचा देखील समावेश आहे. 19 मार्च 2021 रोजी हा चित्रपट प्रत्यक्ष चित्रपटगृहांत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीच्या या चित्रपटाचे एकीकडे प्रमोशन सुरु असताना दुसरीकडे चित्रपटाची गाणीही प्रदर्शित होत आहेत. अलीकडेच या चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज करण्यात आले जे यो यो हनी सिंगने गायले आहे.

‘शोर मचेगा’ असे या गाण्याचे टायटल आहे. चित्रपटाचे हे गाणे रिलीज होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होऊ लागले आहे. रिलिझच्या अवघ्या 3 तासातच गाण्याला जवळपास 1.5 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे खूपच धमाकेदार असून यात यो यो हनी सिंगचा जलवा पाहायला मिळत आहे.

पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार इम्रान हाशमी
हानी सिंगच्या या गाण्याबद्दल चाहते खूप उत्साही दिसत आहेत, यामुळे हनीसिंगचा जुना चार्म पुन्हा एकदा परत येणार असल्याचा अनेक चाहत्यांचा विश्वास आहे. हे गाणे जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीवर चित्रीत करण्यात आले आहे. यावेळी इम्रान पोलीस अधिकऱ्याच्या गेटअपमध्ये पाहायला मिळत आहे. या गाण्याचे बोल होमी दिल्लीवालाने लिहिले असून म्युझिक हनी सिंगने दिले आहे.

जॉन – इम्रान पहिल्यांदाच दिसणार एकत्र
मुंबई सागा चित्रपटाच्या माध्यमातून जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनीही एकमेकांच्या कंपनीचा खूप आनंद लुटला. या चित्रपटाच्या कलाकाराविषयी सांगायचे झाले तर जॉन आणि इम्रान व्यतिरिक्त सुनील शेट्टी, गुलशन ग्रोव्हर, प्रेतिक बब्बर समीर सोनी आणि महेश मांजरेकर सारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे.