नाशिक : अखेर तुकाराम मुंढेंनी आपले बिऱ्हाड हलवले..

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याच्या प्रशासनात दबंग प्रशासकीय अधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे नाशिक महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अखेर मुंबईला आपले बिऱ्हाड हलवले आहे.
केवळ आकरा महिन्याच्या त्यांच्या कारकीर्दीत वादग्रस्त निर्णय घेऊन शहराला त्यांनी वेठीस धरले होते. त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या निवासस्थानाच्या चाव्या महापालिकेच्या अधिकाऱ्याकडे सोपवल्या आहेत. त्यांनी आपले काही दायित्व राहणार नाही, याची देखील काळजी घेतली आहे.

मुंढे यांची जेव्हा नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी बदली झाली होती, त्याच्या दुसऱ्याच दिवशी, त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच चोपले होते, हेच नाही तर या अगोदर देखील त्यांनी, जालना, सोलापूर, पुणे, येथे विविध पदावर काम करतांना देखील त्यांनी आपली दबंग भूमिका साकारली होती. त्यामूळे राज्याच्या प्रशासनात पारदर्शी कारभार करणारा प्रशासकीय अधिकारी अशी ओळख त्यांनी निर्माण झाली आहे. नाशिक येथे आकरा महिने जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांनी आता मुंबईला आपले बिऱ्हाड हलवले आहे.