Murali Sharma | 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे मुरली शर्मा मानतात स्वतःला मुंबईकर; प्रसिद्ध व्हिलनचा आज वाढदिवस

पोलीसनामा ऑनलाइन – हिंदी, मराठी, दाक्षिणात्य अशा सर्वच चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते मुरली शर्मा (Murali Sharma) यांनी संपूर्ण देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही अभिनेते व अभिनेत्री ह्या एक किंवा दोन चित्रपटसृष्टीमध्ये कामं करतात. पण मात्र हा असा कलाकार आहे ज्याने अनेक भाषांमधील चित्रपटसृष्टीमध्ये दमदार अभिनय केला आहे आणि तो अभिनेता म्हणजे मुरली शर्मा. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या मुरली शर्मा (Murali Sharma) यांना जवळजवळ सर्वच प्रेक्षक ओळखतात. त्यांनी त्यांच्या हटके स्टाईलमध्ये व्हिलनचे पात्र नेहमीच साकारले आहे. अशा लोकप्रिय खलनायक अभिनेते मुरली शर्मा यांचा आज वाढदिवस (Murali Sharma Birthday) आहे.

अभिनेते मुरली शर्मा यांचा जन्म 9 ऑगस्ट 1972 रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर (Guntur, Andhra Pradesh) येथे झाला. मुरलीचे वडील ब्रिजभूषण शर्मा हे मराठी तर आई तेलुगू आहे. आंध्र प्रदेश मध्ये जन्म झाला असला तरी खूप लहान वयामध्येच मुंबई (Mumbai) मध्ये वास्तव्यास आले. त्यामुळे ते स्वतःला मुंबईकर म्हणतात आणि मानतात. मुरली यांनी मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम अशा भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुरली यांनी 130 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांनी अभिनयाचे शिक्षण देखील घेतले आहे. मुरली यांनी रोशन तनेजा यांच्या अॅक्टिंग स्कूलमध्ये (Roshan Taneja Acting School) अभिनयाचे रितसर शिक्षण घेतले. ग्रॅज्युएशन नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

अभिनेते मुरली शर्मा (Murali Sharma) यांनी त्यांच्या अभिनयाच्या बळावर अनेक खलनायकाच्या
(Murali Sharma As villain) भूमिका साकारल्या आहेत. अनेकदा त्यांनी व्हिलनचेच पात्र साकारले आहे.
मात्र खलनायकाचे पात्र साकारुनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनात त्यांची वेगळी जागा निर्माण केली आहे.
मुरली यांचे अनेक चित्रपट (Murali Sharma Movies) बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. त्यांना नंदी पुरस्कार,
सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी सीमा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
मुरली शर्मा यांचे बॉलीवुडमधील गोलमाल फ्रेंचायझी (Golmaal), ‘ढोल’ (Dhol), ‘धमाल’ (Dhamal), ‘ब्लैक फ्राइडे’
(Black Friday), सर्कस (Circus) हे चित्रपट गाजले आहेत. त्यांनी मराठी सिनेविश्वामध्ये देखील कामं केली आहेत.
मुरली शर्मा यांनी अजिंठा (Ajantha), पोस्टर बॉईज (Poster Boys), गुरु (Guru) या चित्रपटांमध्ये भूमिका
साकारल्या आहेत. आज अभिनेते मुरली शर्मा त्यांचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Late MLA Mukta Tilak | आमदार स्व.मुक्ता टिळक यांच्या जयंतीनिमित्त कर्करुग्णांवर मोफत उपचार व तपासणी शिबिराचे 17 व 18 ऑगस्ट रोजी आयोजन

Pune Police News | हडपसर पोलिसांकडून अल्पवयीन मुलांसाठी मार्गदर्शन शिबीर

Jailer Movie | रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटानिमित्त चेन्नई शहर सजलं; सर्वत्र लागलेत पोस्टर