Murlidhar Mohol Baner Balewadi Rally | महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या बाणेर-बालेवाडीतील रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Murlidhar Mohol Baner Balewadi Rally | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघात रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळीच कोथरूड विधानसभा मतदारसंघातील (Kothrud Vidhan Sabha) बाणेर-बालेवाडी परिसरात रॅली काढण्यात आली. या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, हा थोडासा विखुरलेला परिसर असला आणि पश्चिम पुणं म्हणून नवी ओळख निर्माण करत असताना इथली माणसं मात्र कमालीची आपुलकीची आहेत. साऱ्यांनीच प्रचंड उत्साहात रॅलीचं स्वागत केलं. भगिनींनी औक्षण करायला येणं, तरुण-तरुणींची सेल्फीसाठी झुंबड उडणं, घोषणा देणं, अनेक कार्यकर्त्यांची भेटण्यासाठीची, काहीतरी सांगण्यासाठीची लगबग… हे सारंच कमालीचं आनंद देऊन जातं.

सुतारवाडी गावठाणातील (Sutarwadi Gaothan) मारुती भैरवनाथ मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली शिवनगर, साई चौक, सूस रोडमार्गे पाषाण, शिवशक्ती चौक, बालाजी चौक, वाकेश्वर चौक, पूनम बेकरी, ढेरे बखळ, कॉसमॉस बँक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पाषाणचे भैरवनाथ मंदिर, लमाण तांडा, विधाते वस्ती बाणेर, मेडीपॉइंट हॉस्पिटल, ताम्हणे चौक, शिवाजी महाराज चौक बाणेर, राघूनाना चौक, बालेवाडी फाटा, बालेवाडी गाव या परिसरात फिरली. शेवटी बालेवाडी येथे तिचा शानदार समारोप झाला.

या रॅलीत बोलताना पुन्हा एकदा आवर्जून विकसित भारताची आणि देश-विकासातील अनेक योजना पुण्याच्या पदरात पाडून
घेण्याची सुवर्णसंधी आपल्याला चालून आली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खंबीर साथ देऊया,
असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले. त्याला जोरदार निर्धार करीत सर्वांनीच प्रतिसाद दिला. (Murlidhar Mohol Baner Balewadi Rally)

या रॅलीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil),
खासदार प्रा. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी,
माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | दोन लाख पुणेकरांनी घेतल्या ‘व्होटिंग स्लिप’; मोहोळ यांच्या प्रभावी यंत्रणेचा नागरिकांना फायदा

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांनी दिले चोख प्रत्युत्तर, ”शरद पवार मुद्दाम आजारी पडले, हा अजितदादांचा विचार हास्यास्पद”

Solapur Lok Sabha | धक्कादायक! सोलापुरात मतदाराने पेट्रोल टाकून जाळली EVM मशीन, घटनेनंतर बंदोबस्त वाढवला (Video)

Murlidhar Mohol | झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर – मुरलीधर मोहोळ