Murlidhar Mohol | महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची हास्यक्लबला भेट ! नवा भारत घडविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) महायुतीचे (Mahayuti BJP Candidate) उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघात वेगेवगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात हास्यक्लबच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमानंतर बोलताना मोहोळ म्हणाले, पुणे शहरातील सर्व हास्यक्लबला भेटण्याचा योग आला आणि प्रचाराच्या धामधूमीतही सकाळ अशी प्रसन्न हास्यकल्लोळात गेल्याचे त्यांनी सांगितले.(Murlidhar Mohol)

मुरलीधर मोहोळ म्हणाले, असं म्हटलं जातं की, हसत राहिले की माणसाचे मन प्रसन्न राहतं! ते खरेही आहे. माणसाच्या ताणतणावाच्या जीवनशैलीत त्याच्या चेहेऱ्यावर हास्याची थोडी जरी लकेर उमटली, तरी त्याचं आयुष्य समृद्ध व्हायला मदत होते. आपल्या शहरातील अनेक हास्यक्लब रोज हे महत्त्वाचं कार्य करीत आहेत. अशा पुणे शहरातील सर्व हास्यक्लबना भेटण्याचा योग रविवारी आला आणि प्रचाराच्या धामधूमीतही सकाळ अशी प्रसन्न हास्यकल्लोळातच गेली.

निमित्त होतं, पुणे शहरातील हास्यक्लबच्या मेळाव्याचं.
प्रसिद्ध एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांनी नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वतीनं याचं संयोजन केलं होतं.
शहरातील हास्यक्लबचे अनेक सभासद आवर्जून उपस्थित होते. त्यांच्याशी रंगलेल्या हास्यविनोदात आम्ही सारे एक झालो होतो.
अर्थात त्यांच्याही काही समस्या आहेत. त्याही जाणून घेतल्याचे मोहोळ यांनी म्हटले.
तसेच भविष्यात कोणतीही अडचण आली, तर ती सोडविण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी, आणखी नवा भारत घडविण्यासाठी
महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहनही केलं.
यावेळी उपस्थितांनी पाठीशी खंबीरपणे असल्याचे दिलेलं आश्वासन बळ वाढविणारं असल्याचे त्यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Chandrakant Patil | अजितदादा स्पष्टच म्हणाले, ”चंद्रकांत पाटील ते चुकीचंच बोलले, आम्ही त्यांना सल्ला दिला …बारामतीत आमचे कायकर्ते पाहुन घेतील”

Pune Crime News | पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमधील धक्कादायक प्रकार, विद्यार्थिनींचे चोरुन व्हिडीओ काढणाऱ्या दोघांवर FIR, विद्यार्थिनीचा समावेश

Kondhwa Pune Crime News | पुणे : गाडीची लाईट डोळ्यावर चमकल्याने 20 जणांच्या टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण (Video)