Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना केले आश्वस्त, म्हणाले – ‘प्रकल्पांना गती देता येईल’

पुणे : Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) महायुतीचे भाजपाचे उमदेवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. प्रचारफेरी, रोड शोद्वारे ते जोरदार प्रचार करत आहेत. नुकतेच त्यांनी पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन केले होते. या प्रचारफेरीत महायुतीचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी, शहरातील झोपडीधारकांना हक्काचे घर मिळण्याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.

या प्रचारफेरीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), खासदार डॉ. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), दत्ता गायकवाड, अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सनी निम्हण, रोहिणी चिमटे, प्रमोद निम्हण, लहू बालवडकर, अमोल सुतार, सचिन पासलकर, सचिन दळवी, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, अनिकेत मुरकुटे, सुहास निम्हण, विशाल विधाते, राहुल बालवडकर, प्रवीण शिंदे, संग्राम मुरकुटे, सुभाष भोर हे सहभागी झाले होते. (Murlidhar Mohol)

याप्रसंगी मतदारांशी संवाद साधताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी ७० ऐवजी ५१ टक्के झोपडीधारकांची संमती, तीनशे चौरस फुटांचे घर, प्रकल्पासाठी वेळेचे बंधन अशा अनेक गोष्टी राज्यातील महायुती सरकारने नवीन नियमावलीत केल्याने या प्रकल्पांना गती देता येईल आणि झोपडीधारकांना हक्काचे घर मिळेल, असे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले.

याबाबत अधिक माहिती देताना मोहोळ म्हणाले की, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ५५७ झोपडपट्ट्या असून,
त्यापैकी २८६ घोषित झोपडपट्ट्या आहेत. अघोषित झोपडपट्ट्यांची संख्या २७१ इतकी आहे.
एकूण २ लाख २६१ झोपडपट्टीतील घरे असून, १२ लाख रहिवासी वास्तव्य करतात.
सध्याच्या जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन करताना आहे
त्याच जागेवर किंवा त्या जागेपासून दोन किलोमीटर परिसरात स्थलांतर करून पुनर्वसन करण्याची तरतूद नियमावलीत होती.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, सुधारित नियमावलीत दोनऐवजी पाच किलोमीटरच्या परिघात पुनर्वसन करण्यास मान्यता दिली आहे.
प्रकल्पांना प्रोत्साहन मिळावे यासाठी वाढीव चटई निर्देशांक व अन्य सवलती दिल्या जाणार आहेत.
सरकारी जागांवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन एसआरए करणार आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा, आढळरावांनाही दिले आव्हान, ”स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करणारा…”

Yerawada Pune Crime News | पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Rupali Chakankar | रूपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षांची मागणी