संगीतकार यशवंत देव चिंताजनक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर शुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यशवंत देव हे ९१ वर्षांचे आहेत. १० ऑक्टोबरपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

#MeToo: साजिद खानवर आणखी एका अभिनेत्रीचा आरोप

काही दिवसांपासून खूपच अशक्तपणा आल्याने देव यांना शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीमध्ये त्यांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यादृष्टीने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृतीत सुधारणा आढळून आली नसून, ती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. सध्या त्यांच्यावर न्यूमोनिया या श्वसनविकारावरही उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान काहीवेळा हाक मारल्यावर देव यांनी डोळे उघडून प्रतिसाद दिला. मात्र, आजारपणाचा अवयवांवर परिणाम झाल्याचीही माहिती आहे. त्यांना चिकुनगुनियाची लागण झाली असल्याने डॉक्टर त्यादृष्टीने त्यांच्यावर उपचार करत आहेत.