खळबळजनक ! मुस्लीम मुलीच्या ऑर्डरवर ‘स्टारबक्स’नं नावाऐवजी लिहीलं ISIS, आयोगाकडे तक्रार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अमेरिकेमधील मिनिसोटा येथील टार्गेट स्टारबक्समध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका मुस्लीम तरुणीला ऑर्डर देताना कॉफी कपवर तिचे नाव लिहिण्याऐवजी आयएसआयएस असे लिहिण्यात आले होते. मध्य आशियामधील दहशतवादी संघटनेच्या नावाने या मुलीचा उल्लेख केल्याचा आरोप आता कॅफे शॉपवर केला जात आहे. या प्रकरणामध्ये या 19 वर्षीय मुलीने मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली आहे.

आयशा असे या मुलीचे नाव असून घटडलेल्या प्रकरणामध्ये अमेरिकेतील मिनिसोटा येथील अमेरिकन इस्लामिक रिलेशनने तिची बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे. कॅफे व्यवस्थापनाने आपल्या धार्मिक भावनांच्या आधारे दुजाभाव केल्याचा आरोप आयशाने केला आहे. मिनिसोटा येथील मानवी हक्क आयोगासमोर पहिल्यांदा हे प्रकरण सुनावणीसाठी आले होते. कपावरील आयएसआयएस अक्षरे पाहिल्यावर मला धक्काच बसला, अशी प्रतिक्रिया आयशाने दिली. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया या दहशतवादी संस्थेच्या नावाने या मुलीचा उल्लेख कपवर करण्यात आला होता.