Mutual Fund Investments | म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे होणार अधिक सुरक्षित; घोटाळे येणार आता समोर

पोलीसनामा ऑनलाइन – Mutual Fund Investments | गुंतवणूक (Investment) करण्यासाठी अनेक प्रकाराचे पर्याय बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये चांगल्या परताव्यासाठी लोकांची खूप पसंती म्युच्युअल फंड या गुंतवणूकीच्या (Mutual Fund Investments) प्रकारासाठी मिळत आहे. मागील काही वर्षामध्ये म्युच्युअल फंडमध्ये इव्हेस्टमेंट करण्यासाठी लोक SIP करत असून घसघशीत परतावा देखील मिळवत आहेत. लॉन्ग टर्मसाठी हा एक सुरक्षित पर्याय आहे. आता मात्र सेबी (SEBI) तर्फे म्युच्युअल फंड करण्याऱ्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर घेऊन आले आहे. म्युच्युअल फंडच्या एसआयपी करण्यामध्ये अनेकजण घोटाळा करत असल्यामुळे सेबीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

सिक्‍युरिटीज ॲन्ड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India) अर्थात सेबी (SEBI) ही भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी महत्त्वाची संस्था आहे. सेबीच्या हे निदर्शनास आले आहे की म्युच्युअल फंडच्या एसआयपीमध्ये अनेक काही गुंतवणूकदार घोटाळा (Scam) करत आहेत. म्युच्युअल फंडची चुकीची विक्री व घोटाळा टाळण्यासाठी सेबीकडून AI उपकरण बनवण्यात येत आहे. याच्या सहाय्याने चुकीच्या प्रकारांना आळा घालता येणार असल्याचे सेबीच्या चेअरपर्सन माधुरी पुरी (SEBI Chairperson Madhuri Puri) यांनी स्पष्ट केले आहे. या उपकरणाचा योग्य तो वापर होणार असून याचा फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे.

सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी यांनी मंगळवारी (दि.05) संवाद साधत सर्वांना या नवीन AI उपकरणाबद्दल माहिती दिली आहे.
म्युच्युअल फंडमध्ये होणाऱ्या चुकीच्या विक्रीचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की, अलीकडेच एका 90 वर्षीय व्यक्तीला सात वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह उत्पादन विकले गेले. नवीन उपकरणामुळे अल्गोरिदममुळे अशी प्रकरणे पकडण्यास मदत होईल, आणि योग्य उत्पादन लोकांना विकता येईल.

पुढे सांगण्यात आले की, आम्ही चुकीची विक्री रोखण्यासाठी काम करत आहोत. म्युच्युअल फंडमध्ये घोटाळा हा वितरक,
एजंट किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून केला जाऊ शकतो. त्यांनी कबूल केले की ही एक अतिशय गुंतागुंतीची
(Mutual Fund Investments) समस्या आहे, ज्यावर मात करण्यासाठी AI आवश्यक आहे.
त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा चांगला वापर हा घोळाटे रोखण्यासाठी केला जाणार आहे.
यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करु इच्छुक गुंतवणूक दारांसाठी ही गोष्ट फायदेशीर ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pankaja Munde On Maratha Reservation | ‘आता नुसती आश्वासनं नकोत’ मराठा आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचे विधान