Mutual Fund | म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक करता का? तात्काळ करा ‘हे’ काम अन्यथा काढू शकणार नाही तुमचे पैसे; जाणून घ्या

नवी दिल्ली : Mutual Fund | तुम्ही म्युचुअल फंड (Mutual Fund) मध्ये पैसे लावता का? मग ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. म्युचुअल फंड ट्रान्सफर एजन्सी कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिस (CAMS) नुसार, म्युचुअल फंड (MF) मध्ये पैसे लावणार्‍या जवळपास 20-30 लाख लोकांनी आपल्या पॅनसोबत आधार लिंक केलेले नाही. यामुळे त्यांचे 30 सप्टेंबरनंतर आर्थिक नुकसान होऊ शकते.

कारण, 30 सप्टेंबरपासून महत्वाचे नियम बदलणार आहेत. या नियमांतर्गत जे लोक डेडलाईनपर्यंत पॅन-आधार लिंक (PAN-Aadhaar Link) करणार नाहीत त्यांचे पॅन कार्ड (PAN Card) अवैध होईल. याचा थेट परिणाम म्युचुअल फंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर सुद्धा पडू शकतो. आधार-पॅन लिंक नसेल तर प्राप्तीकर कायद्यांतर्गत 10,000 रुपयांचा दंड आहे.

बंद होईल SIP

जर तुम्ही पॅन-आधार लिंक केले नसेल तर तुम्ही म्युचुअल फंडमध्ये नव्याने गुंतवणुक करूशकणार नाही आणि म्युचुअल फंडचे पैसे काढू शकणार नाही. सेबीच्या नियमानुसार, फंडचे पैसे केवायसी आणि पॅन वैध असल्याशिवाय काढता येणार नाहीत.

असे करा पॅन-आधार लिंक

– सर्वप्रथम इन्कम टॅक्सची ऑफिशल साईट incometaxindiaefiling.gov.in वर जा.

– तेथून लिंक आधार वर क्लिक करा.

– नंतर क्लिक हिअर वर क्लिक करा.

– खाली दिलेल्या बॉक्समध्ये पॅन, आधार नंबर, आपले नाव आणि दिलेला कॅप्चा टाइप करा.

– सर्व बॉक्स भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.

– नाव किंवा नंबरमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड करू नका.

हे देखील वाचा

Pankaja Munde | करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेचं ट्विट; म्हणाल्या – ‘परळी सुन्न आहे…’

Kopardi Rape Case | कोपर्डी प्रकरणाची लवकर सुनावणी होण्यासाठी शासनाची उच्च न्यायालयाला विनंती

Parambir Singh Case | चांदीवाल कमीशनने परमबीर सिंह यांच्याविरूद्ध जारी केले वॉरंट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Mutual Fund | your mutual fund sips to be affected if pan aadhaar card are not linked check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update