Kopardi Rape Case | कोपर्डी प्रकरणाची लवकर सुनावणी होण्यासाठी शासनाची उच्च न्यायालयाला विनंती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे घडलेल्या बालिकेवरील बलात्कार (Kopardi rape and murder case) आणि खून प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर (District Sessions Court Ahmednagar) यांनी या प्रकरणातील तीनही आरोपीना खून आणि बलात्कार (Kopardi rape and murder case) या आरोपांसाठी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. सदर फाशीच्या शिक्षेच्या निश्‍चितीकरण्यासाठी राज्य सरकारने (State Government) औरंगाबाद खंडपीठ (Aurangabad Bench) येथे फाशी निश्चितीकरणाचा अर्ज दाखल विहित वेळेत दाखल केला होता.

त्याचप्रमाणे, यातील आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ (Santosh Bhawal) यांने फाशीच्या शिक्षेच्या विरोधात अपील दाखल औरंगाबाद खंडपीठात दाखल केले होते.
त्यानंतर सदर प्रकरणाची औपचारिक सुनावणी औरंगाबाद खंडपीठ येथे होऊन यातील आरोपी क्रमांक
दोन याच्या अपिलाच्या सुनावणीच्या दरम्यान त्याच्या अपिलाला झालेला विलंब माफ करून अपील दाखल करून घेण्यात घेण्यात आले होते.
संतोष भवाळ याने मुंबई उच्च न्यायालय (bombay high court) येथे स्वतंत्र याचिका दाखल करून सदर संपूर्ण प्रकरण औरंगाबादहुन मुंबईला वर्ग करण्यासंबंधी विनंती केली होती.
औरंगाबाद येथे प्रलंबित असणारे आरोपी संतोष भवाळचे अपील त्याचप्रमाणे राज्य शासनाने दाखल
केलेले फाशीच्या शिक्षेच्या निश्चितीकरणाचे अपील ही दोन्ही प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयाकडे
वर्ग करण्यात आले आहेत.

दरम्यान यातील आरोपी क्रमांक एक जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) आणि आरोपी क्रमांक तीन
नितीन भैलुमे (Nitin Bhailume) यांनीही मुंबई उच्च न्यायालयामध्ये फाशीच्या शिक्षेविरुद्ध
अपील विलंबाने दाखल केली आहेत.
या तिन्ही प्रकरणाची त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या अपिलाची सुनावणी न्यायमूर्ती रणजीत मोरे (Justice Ranjit More) आणि न्यायमूर्ती तावडे (Justice Tawde) यांच्यासमोर मागील तारखेस होऊन
सर्व प्रकरणे दाखल करून घेऊन न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी सदर प्रकरणाची नियमित सुनावणी घेण्यासंबंधी सूचित केले होते.
त्या अनुषंगाने कोपर्डी प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय येथे 25 फेब्रुवारी 2020 पासून नियमितपणे सुरू होणार होती पण लॉकडाउनमुळे ती होऊ शकलेली नाही.

 

या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील (Special Public Prosecutor Umesh Chandra Yadav-Patil) यांनी या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी आज उच्च न्यायालयाला विनंती पत्र ऑनलाईन सादर केले आहे.
यामुळे या प्रकरणाची लवकरच सुनावणी होण्यासंबंधी आशावाद व्यक्त केला जात आहे.

 

Web Title : Kopardi Rape Case | Government’s request to the High Court for an early hearing in the Kopardi case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण ! आरोपींना वकील आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी न्यायालयाने दिला वेळ, आता ‘या’ तारखेला आरोप निश्चिती

ICRA | ऑगस्टमध्ये वाढली देशांतर्गत हवाई वाहतूक, झाली 31 टक्केची वाढ

Pune Crime | पुण्यातील नायडू हॉस्पीटलमधील महिला डॉक्टरचा तलाठी पतीकडून खून