राबडी देवींची मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर ‘कडक’ टिका, म्हणाल्या…

पाटना : वृत्तसंस्था – बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात चमकी तापामुळे शंभरहून अधिक मुलांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्य आणि केंद्र सरकार यावर आळा तसेच उपाय करण्यास असमर्थ ठरले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून राज्यात या आजाराने मोठ्या प्रमाणात मुलांचा मृत्यू होत असताना राजकारणी मात्र आपल्या राजकारणात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन त्यांच्यावर याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. सुमारे पंधरा दिवसानंतर मुख्यमंत्री या मुलांना भेटण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर त्यांच्यावर बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या राबडी देवी यांनी त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.

चमकी तापाने आतापर्यंत राज्यात १०८ मुलांचा मृत्यू झाला असून ४०० मुले दवाखान्यात भरती आहेत. तब्बल १८ दिवसांनी दवाखान्यात भेट देण्यास पोहोचल्याने बाहेरील नागरिकांनी जोरदार विरोध केला. तसेच काळे झेंडे दाखवत ‘चले जाव’चे नारे दिले. तर मृत मुलांच्या नातेवाईकांनी नितीश कुमार मुर्दाबादचे नारे दिले. उशिरा भेटीसाठी दाखल झालेल्या नितीशकुमार यांच्यावर राबडी देवी यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि, बिहारमधील आरोग्य विभागालाच चमकी ताप आला आहे. त्यामुळे ते स्वतःच तंदुरुस्त नाहीत तर राज्याचा काय विचार करणार. ट्विटमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे कि, दरवर्षी आजाराने हजारो मुलं आणि बालक दगावत असतात, मात्र सरकार प्रत्येक वर्षी कोणतीही तयारी करत नाही. अर्थसंकल्पात तरतूद केला जाणारा निधी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घशात जात असल्याने सामान्य माणसाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, या प्रकरणात राबडी देवी यांच्या या टीकेवर मुख्यमंत्री नितीश कुमार काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सिनेजगत

अभिनेता शाहिद कपूरच्या चाहत्यांना मोठा ‘झटका’, कारण…

…म्हणून श्रीदेवी साऊथ सुपरस्टार रजनीकांतच्या तोंडावर थुंकल्या होत्या

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

 जंक फूड महिलांच्या आरोग्यासाठी घातक

सावधान ! गुणवत्ता तपासणीत ५ टक्के ब्रॅन्डड कंडोम फेल

पचनप्रणाली बिघडल्यास होऊ शकतो यकृतावर परिणाम

कार्डिअ‍ॅक रजिस्ट्रीसाठी ‘अपोलो’ आणि ‘अबोट’चा पुढाकार

 हृदय प्रत्यारोपणाचे २५ लाख भरायचे कसे ? ‘तो’ शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत

 

Loading...
You might also like