लालू प्रसाद यादव यांचा मुलगा RJD नेता तेजस्वी हरवल्याचे ‘पोस्टर’, शोधून देणाऱ्यास ‘बक्षिस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुजफ्फरपुर मध्ये आरजेडीचे नेता तेजस्वी यादव हारवल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर हे लिहण्यात आले आहे की, त्यांनी शोधून देणाऱ्याला 5100 रुपये बक्षीस म्हणून दिले जाईल. नुकत्याच होऊन गेलेल्या लोकसभा निवडणूकीत आरजेडीला मोठी हार सहन करावी लागेल. या वाईट प्रदर्शनानंतर तेजस्वी यादव दिसेनासेच झाले. यावरून बऱ्याचदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. विपक्ष नेता असून त्यांनी बिहारमध्ये घटणाऱ्या कोणत्याही प्रकारावर काहीही भाष्य केलेले नाही.

हे पोस्टर तमन्ना हाशमी नावाच्या कोण्या एका सामाजिक कार्यकर्त्यांने लावले आहे. एकीकडे आरजेडी हा त्यांचा पक्ष सरकारला विविध प्रश्नावर घेरत आहे तर दुसरीकडे तेजस्वी यादव गायब झालेले आहेत. गुरुवारी तेजस्वी यादवची बहीन आणि राज्यसभा खासदार मीसा भारतीने पंतप्रधान मोदींनी आयोजित केलेल्या डिनर कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला होता.

लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर तेजस्वी यादव सक्रिय राजकारणातून एकदम गायब झाले. त्यावर बरीच चर्चा झाली. मागील दिवसाता जेव्हा आरजेडीचे नेता रघुवंश प्रसाद सिंह यांनी विचारण्यात आले की बिहारचे विरोधी पक्ष नेता कुठे आहेत यावर रघुवंश प्रसाद सिंह यांनी सांगितले की मला याबाबत काहीही माहिती नाही.

आरोग्य विषयक वृत्त –

२१ जून जागतिक योग दिन : ” हे ” आहेत भारतातील सर्वात मोठे योगगुरू

‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय

‘त्या’ महिलेचे स्तनांची रहस्यमय पद्धतीने वाढ, डॉक्टर्सही चिंतेत