बनावट मोबाइल सिम घेण्यासाठी कुणी तुमच्या आयडीचा तर वापर केलेला नाही ना? घरबसल्या ‘या’ पद्धतीने जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – बनावट आयडीवरून मोबाइल फोनचे सिम घेणे काही नवीन गोष्ट नाही. नेहमी अशी प्रकरणे समोर येतात जिथे गंभीर गुन्ह्यात बनावट आयडीचा वापर करून खरेदी केलेल्या सिमचा वापर केलेला असतो. तसेच अशीही असंख्य प्रकरणे आहे ज्यात लोकांनी डॉक्युमेंट नसल्याने दुसर्‍यांच्या आयडीचा वापर केलेला असतो. बहुतांश प्रकरणात फसवणुकीच्या प्रकाराला बळी पडलेल्या व्यक्तीला तेव्हाच समजते जेव्हा तपासासाठी प्रकरण उघडले जाते.

मात्र, आता अशा प्रकारणांना रोखण्यासाठी पावले उचलली आहेत, यामध्ये आता सरकारने सामान्य लोकांसाठी सुद्धा मार्ग खुला केला आहे. दूरसंचार विभागाने tafcop.dgtelecom.gov.in हे पोर्टल लाँच केले आहे ज्यामध्ये तुम्ही स्वत: आपल्या आयडीवर जारी मोबाईल नंबरची माहिती घेऊ शकता आणि संशय असल्यास त्या नंबरची सहजपणे तक्रार सुद्धा करू शकता आणि सिम ब्लॉक करू शकता.

अशी वापरा ही सेवा
* सर्वप्रथम दूरसंचार विभागाचे पोर्टल tafcop.dgtelecom.gov.in वर व्हिजिट करा.
* येथे 10 अंकी मोबाइल नंबर नोंदवा.
* यानंतर मोबाइल नंबर व्हेरिफिकेशनसाठी मोबाइलवर ओटीपी येईल.
* हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा नंबर व्हेरिफाय होईल.
* तुमच्या सर्कलमध्ये सुविधा उपलब्ध असेल तर व्हेरिफिकेशन नंतर सर्व मोबाईल नंबरची लिस्ट येईल, जे तुमच्या आयडीवर सुरू आहेत.
* जर तुम्हाला वाटत असेल की एखादा नंबर असा आहे ज्याची तुम्हाला माहिती नाही तर त्या नंबरची तक्रार याच पोर्टलवर करू शकता.
* सरकार तुम्ही सांगितलेल्या नंबरची चौकशी करेल.
* जर नंबर तुमच्या आयडीवर चालत असल्याचे आढळले तर तो ब्लॉक केला जाईल.
* ही प्रकिया तुम्हाला पुढील सर्व संभाव्य नुकसानापासून वाचवू शकते.