TV नंतर बॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’ करणार नागिन फेम BOLD अभिनेत्री सुरभि, ‘हा’ असणार डेब्यू सिनेमा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नागिन 3 या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात खास जागा बनवणारी अ‍ॅक्ट्रेस सुरभी ज्योती लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सुरभी ज्योती आपला बॉलिवूड डेब्यू करणार आहे. सोनम गुप्ता बेवफा है असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात तिच्यासोबत प्रसिद्ध पंजाबी सिंगर जस्सी गिल लिड रोलमध्ये असणार आहे.

सुरभीने या सिनेमात केलं आहे काम
सुरभीचा पहिला बॉलिवूड सिनेमा एक रोमँटीक कॉमेडी सिनेमा असणार आहे. बॉलिवूड सिनेमा करण्यापूर्वी सुरभी इक कुडी पंजाब दी, मंडे पटियाला दे, यांसारख्या पंजाबी सिनेमात झळकली आहे. याशिवाय तिने पंजाबी सिरीजमध्येही काम केलं आहे. परंतु तिला अ‍ॅक्ट्रेस म्हणून खरी ओळख कुबूल है आणि नागिन या मालिकेतून मिळाली.

जस्सी गिल एक पंजाबी सिंगर आणि अ‍ॅक्टर आहे. त्याचं पूर्ण नाव जसदीप सिंह गिल आहे. जस्सी गिलने हैप्पी फिर भाग जाएगी मध्ये काम केलं आहे. या सिनेमात जस्सी सोबत सोनाक्षी सिन्हा, डायना पेंटी आणि जिमी शेरगिल लिड रोलमध्ये होते.

https://www.instagram.com/p/B1L6x7kDZSL/

https://www.instagram.com/p/BtC0-VIFXtY/

 

Visit : Policenama.com