Nagar ACB Trap Case News | अबब…. 1 कोटीची लाच स्विकारताना सहाय्यक अभियंता किशोर गायकवाड आणि कार्यकारी अभियंता गणेश वाघ अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagar ACB Trap Case News | तब्बल 1 कोटी रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी (Nagar Bribe Case) अहमदनगर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – एमआयडीसीमधील Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) सहाय्यक अभियंता किशोर गायकवाड Assistant Engineer Kishor Gaikwad (32) आणि तत्कालीन उपविभागीय अभियंता आणि सध्या धुळे येथे कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता गणेश वाघ Executive Engineer Ganesh Wagh हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या Anti Corruption Bureau (ACB) जाळ्यात अडकले आहेत. अ‍ॅन्टी करप्शनने ही कारवाई शुक्रारी रात्री उशिरा केली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Nagar ACB Trap Case News)

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी अहमदनगरच्या एमआयडीमध्ये 1000 एमएम व्यासाची लोखंडी पाईपलाईन बदलण्याचे कामाचे मंजूर निविदेनुसार 31 कोटी 57 लाख 11 हजार 995 रूपय रक्कमेचे 5 टक्के प्रमाणे अनामत रक्कम 1 कोटी 57 लाख 85 हजार 995 रूपये तसेच सदर कामाचे सुरूवातीची सुरक्षा ठेव रक्कम 94 लाख 71 हजार 500 रूपये झालेल्या कामाचे अंतिम देयक 14 लाख 41 हजार 749 रूपये असे एकुण 2 कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपये त्यांना (तक्रारदार) मिळावे म्हणुन सदर बिलावर तत्कालीन उपविभागीय अभियंता आणि सध्याचे कार्यकारी अभियंता गणेश वाघ यांचा मागील तारखेचे आऊट वर्ड करून त्यावर त्यांच्या सह्या घेवून सदर देयक त्यांच्याकडे पाठविण्याचा मोबदल्यात सहाय्यक अभियंता किशोर गायकवाड यांनी स्वतःसाठी तसेच गणेश वाघ यांच्याकरिता तक्रारदार यांचे सदर कामाचे बिलाचे व यापुर्वी अदा केलेली काही बिलांची बक्षीस म्हणून 1 कोटी रूपयांची दि. 20 ऑक्टोबर 2023 रोजी मागणी केली होती. (Nagar ACB Trap Case News)

तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. 1 कोटी रूपये लाच म्हणून स्विकारल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कारवाई अ‍ॅन्टी करप्शनचे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील (IPSVishwas Nangare Patil),
नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अप्पर अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy), उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलिस नाईक प्रभाकर गवळी,
संदीप हांगडे, किरण धुळे आणि सुरेश चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfer | लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या व. पो. निरीक्षक पदी शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती