Nagpur News | आरटीओ खरमाटेची ईडीकडून चौकशी ! पुण्यात छापे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Nagpur News | राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Shivsena leader Anil Parab) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) नोटीस बजावली. त्यानंतर सोमवारी (दि.30) नागपूर ग्रामीण आरटीओचे (Nagpur Rural RTO) प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे (Regional Transport Officer Bajrang Kharmate) यांच्या नागपुरातील (Nagpur News) घरावर व कार्यालयावर ईडीचे छापे (ed raid) पडल्याचा चर्चेला उधाण आले. मात्र सायंकाळपर्यंत अशी कोणतीही कारवाई झालेली नाही. खरमाटे यांच्या पुण्यातील (Pune) घरावर ईडीने कारवाई केल्याची माहीती समोर आली आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (money laundering) ईडीने अनिल परब यांना नोटीस बजावली.
यामध्ये परब यांना 31 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
परब यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांच्याशी संबंधित असलेल्या परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावर आज (सोमवार) ईडीने छापेमारी केली.
याबाबतची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली.

सोशल मीडियावर छापे टाकण्यात आल्याचे व्हायरल झाल्यानंतर दुपारी प्रसारमाध्यमांनी सोमवारी कामाठी रोडवरील ग्रामीण आरटीओचे कार्यालय गाठले. मात्र कुठेच कारवाई झालेली नाही.
पुण्याच्या घरावर छापे पडल्याची माहिती पुढे ते असली तरी याबाबत अधिकृतपणे कोणी बोलण्यास तयार नाही.

 

Web Title : Nagpur News | ed inquiry rto kharmate not in nagpur but in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police | व.पो.नि. डांगे यांची नगरला बदली, कोथरूडच्या वरिष्ठ निरीक्षकपदी गुन्हे शाखेतील ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती

Pune News | ‘नाट्यगृह लवकर सुरु करा’, पुण्यात कलाकारांची महाआरती (व्हिडीओ)

Nutrition Reasons | का लागते वारंवार भूक? ‘ही’ 9 कारणे असू शकतात जबाबदार; जाणून घ्या