Nagpur News | भाजपाच्या शिबीरात चेंगराचेंगरी, मोफत गृहोपयोगी वस्तुंच्या आशेने आलेली महिला ठार, ८ ते १० जण जखमी

नागपूर : Nagpur News | नागपूर येथे भाजपाच्या (BJP) कार्यक्रमात एक अतिशय दुर्देवी घटना घडली आहे. येथे बांधकाम कामगारांसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मोफत गृहोपयोगी वस्तुंचे वाटप होणार असल्याने हजारो गोरगरीब महिलांनी एकच गर्दी केली होती. परंतु, नियोजन बिघडल्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये एक महिला ठार झाली, तर ८ ते १० पेक्षा जास्त महिला जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही दुर्घटना आज सकाळी ११ वाजता शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात घडली.

मृत महिलेचे नाव मनूबाई तुळशीराम राजपूत (६५, आशीर्वादनगर) असे आहे. लोकसभा निवडणुक जवळ आल्याने भाजपाने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचाराला सुरूवात केली आहे. आज देखील शिबीराच्या माध्यमातून गृहोपयोगी वस्तुंचे वाटप कामगारांना करण्यात येणार होते. भाजप महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणीकृत कामगारांसाठी हे शिबीर आयोजित केले होते.(Nagpur News)

आज शिबीरात गृहोपयोगी वस्तु मिळणार असल्याने सकाळी १० वाजल्यापासून सुरेश भट सभागृहासमोर हजारो
गोरगरीब कामगारांनी गर्दी केली होती. १०.१५ वाजताच्या सुमारास सभागृहाचे दार उघडले असता एकच झुंबड उडाली
आणि अनेक महिला खाली पडल्या, चेंगराचेंगरी झाली.

यावेळी खाली पडलेल्या मनुबाईंच्या अंगावरून अनेक जण गेल्याने तिचा मृत्यू झाला.
तिला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर जखमी महिलावंर उपाचार सुरू आहेत.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray On BJP | राज ठाकरेंचा भाजपाला थेट सवाल, ”मोदींनी येऊन फुलं वाहिली, त्या अरबी समुद्रातील महाराजांच्या स्मारकाचं काय झालं?”

Police Inspector Suicide | पुणे सीआयडीमधील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, रेल्वे रुळावर संपवलं जीवन

Pune News | बंगळुरुतील कॅफे बॉम्बस्फोटातील दहशतवादी पुण्यात असल्याचा NIA ला संशय, पथकाकडून तपास सुरु

Khadakwasla Crime | तीन तरुणांवर कोयत्याने हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपींच्या हवेली पोलिसांनी आवळल्या मुसक्या (Video)

Pune Pimpri Chinchwad Crime | सराईत वाहन चोराला भोसरी पोलिसांकडून अटक, 16 दुचाकी जप्त