अमेरिकेतून नागराज मंजुळेंची शिवरायांना मानवंदना

वृत्तसंस्था – मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत सिनेदिग्दर्शक नागराज मुंजळे सध्या अमिरेकेत असुन तेथे ते शिवजयंती साजरी करत आहेत. भारतासह जगभारात नावलौकिक असणारे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवजी महाराज यांची आज जयंती आहे. ही जयंती १९ फेब्रुवारी या दिवशी जगभारात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवसाचे महत्व सर्वजण जाणतात. महाराष्ट्रात शिवाजी राजेंना आराध्य दैवता मनतात. सर्वच क्षेत्रातून शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात केली जाते. नागराज मंजुळे यांनी देखील ट्विटरवर एक फोटो शेअर करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – संभाजी उद्यानात ‘त्यांनी’ बसविलेला पुतळा पोलिसांनी हटविला ; पुण्यात प्रचंड खळबळ 

दिग्दर्शक नागराज मंजुळे अमेरिकेतील न्यूयाॅर्कमध्ये आहेत. त्यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवाजी महाराजांच्या वेशातील तरूणासोबातचा फोटो शेअर केला आहे. कन्साॅलेट जनरल ऑफ इंडिया, छत्रपती फाऊंडेशन आणि अल्बनी ढोल पथक यांच्यावतीने न्यूयाॅर्क या ठिकाणी शिवजयंती महोत्सव साजारा करण्यात येत आहे. या महोत्सवासाठी नागराज मंजुळेंना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवरांयानी घडवलेला इतिहास जागविण्याचा प्रयत्न अमिरिकेत वास्तव्य करणाऱ्या मराठी लोकांनी केला.

यावेळी नागराज मंजुळे यांनी शिवाजी महाराजांची वेशभुषा असलेल्या तरुणासोबत सेल्फी काढून तो ट्वीटर तसेच फेसबूक वरुन शेअर केला आहे. या फोटोत शिवाजीराजेंची वेशभुषा असलेला तरुण, नागराज मंजुळे आणि पाठीमागे मावळे दिसत आहेत.