Nagraj Manjule Movies | दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात काम करण्याची नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी; जाणून घ्या नियम व अटी

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वातील दिग्गज दिग्दर्शकांमध्ये नागराज मंजुळे (Nagraj Manjule Movies) यांचे नाव आदराने घेतले जाते. नागराज मंजुळे यांनी अनेक नवोदित कलाकारांना नावारुपाला आणले आहे. सिनेमामध्ये वास्तविकता दाखवणे आणि नवीन चेहऱ्यासह चित्रपटांची निर्मिती करण्यात दिग्दर्शक नागराज (Nagraj Manjule Movies) यांचा हातखंडा आहे. त्यांचे ‘फँड्री’ (Fandry), ‘सैराट’ (Sairat), ‘नाळ’ (Naal), ‘झुंड’ (Jund) हे चित्रपट खूप गाजले आहेत. यामध्ये काम करणाऱ्या कलाकरांचे करिअर झाले आहे. आता पुन्हा नवोदित कलाकरांना नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी देशातील दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव (Wrestler Khashaba Jadhav) यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. यामध्ये नवोदित कलाकरांना काम करण्याची संधी दिली आहे. नागराज मंजुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्टर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. (Work With Nagraj Manjule) यामध्ये नियम व अटी संगितल्या आहेत.

नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ या चित्रपटाच्या (Khashaba Movie) ऑडिशनच्या काही वयोमर्यादा व अटी आहेत. ही संधी फक्त मुलांसाठी असून त्यांचे वय 7 ते 25 वर्षे असणे गरजेचे आहे. (Khashaba Movie Audition) तसेच यासाठी मॅटवरची कुस्ती येणं आवश्यक आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित खाशाबा चित्रपटात काम करु इच्छिणाऱ्या कलाकारांना फॉर्म भरायचा असून त्याबरोबर 30 सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडीओ व 30 सेकंदाचा स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा व्हिडीओ पाठावयचा आहे. याचबरोबर 5 फोटो पाठवायचे असून यामधील 3 फोटो हे शरीरयष्टी दाखवणारे असणे गरजेचे आहेत. या सुवर्णसंधीची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 20 जुलै ही आहे. (Khashaba Movie Audition Information)

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule Movies) हे महान कुस्तीपट्टू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्यावर आधारित चरित्रपट (Khashaba Jadhav Biopic) बनवणार आहे. या चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडियो आणि आटपाट निर्मित असणार आहे. ख्यातनाम पैलवान खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारताचे ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले वैयक्तिक खेळाडू आहेत. (First Indian individual Olympic Winner) त्यांना भारत सरकारतर्फे मरणोत्तर ‘अर्जुन पुरस्कारा’ने (Arjuna Award ) सन्मानित करण्यात आले. अशा दिग्गज कुस्तीपट्टूच्या चरित्रपटामध्ये काम करण्याची संधी नवोदित कलाकरांना मिळाली आहे.

Web Title :  Nagraj Manjule Movies | marathi director nagraj manjule upcoming khashaba movie audition details inside

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा