NCP Chief Sharad Pawar | शरद पवार पत्रकार परिषदेत पत्रकारावर भडकले; म्हणाले – ‘तुमच्यासारख्या…’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड (Maharashtra NCP Crisis) केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण (Former CM Late Yashwantrao Chavan) यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतलं. यानंतर शरद पवारांनी (NCP Chief Sharad Pawar) साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन पुढच्या रणनितीची माहिती दिली. आता आपण राज्यव्यापी दौरा करणार असून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. कार्यकर्ता माझ्यासोबत आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.

आम्ही सोबत काम केलं आहे

अजित पवार परके नाहीत, अजित पवार म्हणजे पक्ष नाही. अजित पवारांना भेटण्यात गैर नाही. काल माझी मुलगी सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) तीनवेळा तिकडे गेली होती, याचा अर्थ तिने चुकीचं काम केलं असं नाही. आम्ही सोबत काम केलं आहे, मतभिन्नता काय आहे हे जाणून घेण्याचं काम एखाद्या सहकाऱ्याने केलं असेल तर मी त्यावर संशय घेणार नसल्याचे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सांगितले.

तुमच्यासारख्या क्षुद्र बुद्धीचा व्यक्ती…

पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी पत्रकारांनाही खडसावलं. अजित पवारांच्या या पावलाला बंड म्हणायचं का आशीर्वाद? असा प्रश्न विचारला असता पवार पत्रकारावर संतापले. आम्ही कुणाच्या अपात्रतेच्या कारवाईमध्ये जाणार नाही. माफ करा पण तुमच्यासारखा क्षुद्र बुद्धीचा व्यक्ती असेल तोच आशीर्वाद देईल, एवढं समजत नाही. मी जाहीरपणाने महाराष्ट्राचा दौऱ्यावर निघालोय पक्षाच्या बांधणीसाठी, त्यावेळेला पत्रकार परिषदेमध्ये आशीर्वाद शब्द वापरुन एकंदर पत्रकारितेचा दर्जा खराब करु नका, अशा शब्दात शरद पवारांनी पत्रकारांना खडसवलं.

तुमच्याकडे काही मेसेज आला का?

अजित पवारांना भेटण्यासाठी वेळ देणार का? असा प्रश्नही विचारण्यात आला. तेव्हा हा जर तरचा विषय आहे. त्यांनी वेळ मागितली तर विचार करु, तुमच्याकडे काही मसेज आला आहे का? तुमच्याकडे पत्र आहे का? असा तिरकस सवाल शरद पवारांनी पत्रकारांना विचारला.

‘त्या’ विधानावरुन अजित पवारांना टोला

अडीच वर्षांपूर्वी जर राष्ट्रवादी शिवसेनेसोबत (Shivsena) जाऊ शकते, तर मग आत्ता आम्ही भाजपसोबत (BJP) जाऊन काहीही चूक केलेली नाही, असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवारांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी आणीबाणीच्या (Emergency) वेळचा एक संदर्भ देत अजित पवारांना टोला लगावला.

त्यामुळे आत्ता आम्ही…

शरद पवार म्हणाले, देशात आणीबाणी जाहीर झाली, तेव्हा देशातील अनेक राजकीय पक्षांनी, माध्यमांनी इंदिरा गांधींविरोधात (Indira Gandhi) आक्रमक भूमिका घेतली. त्या काळात इंदिरा गांधींची भूमिका योग्य आहे असं म्हणणारा एकच पक्ष आणि नेता होता. नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि पक्षाचं नाव शिवसेना. त्यानंतर जी निवडणूक झाली, त्यात शिवसेना हा एकच पक्ष होता ज्यानं एकही उमेदवार उभा केला नाही आणि इंदिरा काँग्रेसच्या (Indira Congress) उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे आत्ता आम्ही वेगळं काही करतोय असं नव्हे.

अडीच वर्षांपूर्वी आम्ही…

वेगळं काहीतरी घडतंय असं सांगण्याचं कारण नाही. यांना हे आज कळलं. अडीच वर्षांपूर्वी आम्ही सरकार स्थापन केलं. त्यावेळी काल ज्यांनी शपथ घेतली त्यांनीही शपथ घेतली होती. त्यावेळी शिवसेनेची चिंता कुणाला वाटली नाही. त्यामुळे आज ते जे म्हणतायत त्याकडे फारसं लक्ष द्यायची गरज नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला.

मी द्वेषाचं राजकारण करत नाही

पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांच्यासोबत गेलेल्यांवर अपात्रतेची (Disqualification) कारवाई सुरु केल्यासंदर्भात विचारण्यात आले. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, तो अधिकार जयंत पाटील (Jayant Patil) यांचा आहे. त्यांना अपात्र करायचं की नाही याचा विचार मी करणार नाही. तो विचार जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी करतील. मी कुणाच्याही बद्दल नाराजी व्यक्त करत नाही. काही सहकाऱ्यांनी जे केलं ते योग्य नाही. मात्र, त्यासाठी मी मनात द्वेष ठेवून राजकारण करत नाही. त्यांनी जर भेटायची वेळ मागितली, तर विचार करु, असं म्हणत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परतीची संधी खुली असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.

आज समजलं कार्यकर्ते का नाराज होते

यावेळी रामराजे (Ramraje Nimbalkar) अजित पवारांसोबत गेल्याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं. आज ते इथे उपस्थित नाहीत याबद्दल समाधान आहे. अनेक कार्यकर्त्यांनी मला आज त्यांच्याबद्दल सांगितलं. त्यांची जी मतं मी आज ऐकली, ते ऐकल्यावर कार्यकर्ते माझ्यावर अधून-मधून नाराज का होते, ते समजलं, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं.

Web Title : NCP Chief Sharad Pawar | sharad pawar reacts on whether he will meet ajit pawar or not after split in ncp Flared at the journalist

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा