Nagrik Hakka Sanrakshan Manch | ससून रुग्णालयाकडून नागरिकांची सनद प्रसिद्ध, रुग्णांच्या आर्थिक फसवणूकीला बसणार चाप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Nagrik Hakka Sanrakshan Manch | पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय (Sasoon Hospital, Pune) हे पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे सार्वजनिक रुग्णालय आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक उपचारासाठी येत असतात. परंतु नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांविषयी माहिती देणाऱ्या नागरिकांच्या सनदेचे फलक ससून रुग्णालयाच्या संकेतस्थळावर व आवारात लावलेले नसल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता, तसेच रुग्णांची दिशाभूल करून एजंटांकडून आर्थिक फसवणूकही होत होती. यासंदर्भात पुण्यातील नागरिक हक्क संरक्षण मंचाने रुग्णालय प्रशासनाकडे तक्रारी निवेदन करून रुग्णालयाच्या दर्शनी भागात व संकेतस्थळावर अद्ययावत नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती. सदर तक्रारीची दखल घेऊन ससून सर्वोपचार रुग्णालयाने त्यांच्या संकेतस्थळावर नागरिकांची सनद प्रसिद्ध केलेली आहे. (Nagrik Hakka Sanrakshan Manch)

 

काय असते नागरिकांची सनद?

प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी तसेच शासनाच्या दैनंदिन कामकाजात पारदर्शकता आणून शासनाचे धोरण राबवण्यासाठी नागरिकांची सनद (सिटीजन चार्टर) तयार करण्यात येते. जनतेला त्यांच्या कामांबाबत होणारी गैरसोय टाळण्यासाठी या सनदेची निर्मिती करण्यात आलेली आहे. जनतेचे काम विहित मुदतीच्या आत करून घेण्याचा हक्क या सनदेमुळे प्राप्त होणार असून जनतेला चांगली सेवा देणे, तसेच कायद्याची व नियमांची अंमलबजावणी संबंधित अधिकाऱ्याद्वारे करून पारदर्शक प्रशासनाची खात्री जनतेला देता येईल अशा महत्त्वाच्या बाबींचा यात समावेश असतो. विलंबास प्रतिबंध करण्याचा अधिनियम 2006 च्या तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय आस्थापनेत नागरिकांची सनद लावणे बंधनकारक आहे. सदर नागरिकांच्या सनदेमध्ये कार्यालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा, त्यासाठी निर्धारित केलेला कालावधी, त्यासाठीचे शुल्क व तक्रार करण्यासाठी पदनिर्धारित केलेले अधिकारी यांची माहिती प्रदर्शित केली जाते. (Nagrik Hakka Sanrakshan Manch)

 

नागरिक हक्क संरक्षण मंचाच्या मागणीला यश

ससून सर्वोपचार रुग्णालयात नागरिकांची सनद नसल्याचे निदर्शनास आल्याने पुण्यातील नागरिक हक्क संरक्षण मंचाच्यावतीने रुग्णालयाच्या संकेतस्थळावर व आवारात दर्शनी भागात नागरिक सनदेचे बोर्ड प्रसिद्ध करण्याचे तक्रारी निवेदन मंचाच्यावतीने अध्यक्ष अविराज मराठे (Aviraj Marathe) व कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर (Praful Gujar) यांनी रुग्णालय प्रशासनास दिलेले होते. सदर निवेदनाची दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाकडून अद्यावत नागरिकांची सनद http://bjgmcpune.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून रुग्णालय आवारातील फलक लावण्याचे कामही लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

 

सदर तक्रारी निवेदनाची ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता श्री. ठाकूर व प्रशासक विभागातील
श्री. शेख यांनी तातडीने दखल घेऊन नागरिकांची सनद प्रसिद्ध केली यामुळे
ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना
सेवा विहित वेळेत मिळण्यासाठी मदत होणार आहे व रुग्णालयातील
एजंटकाकडून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीलाही (Cheating) चाप बसणार आहे.
नागरिकांनी या सनदेतील माहितीचा योग्य उपयोग करून रुग्णालयातील सेवांविषयीचे
आपले हक्क मिळवावेत असे आवाहन नागरिक हक्क संरक्षण मंचच्यावतीने करण्यात आलेले आहे.

 

Web Title : Nagrik Hakka Sanrakshan Manch | Sasoon hospital published the charter of citizens, financial fraud of patients will be covered

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा