NDA Meeting | दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत एकनाथ शिंदे, अजित पवारांना मानाचं स्थान, पहिला फोटो आला समोर (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे भाजप (BJP) विरोधात असलेल्या विरोधकांनी मोट बांधली असताना दुसरीकडे भाजपने शक्तिप्रदर्शन केले आहे. विरोधी पक्षांची बंगळुरूत बैठक झाली. तर एनडीएच्या घटक पक्षांची आज दिल्लीत बैठक (NDA Meeting) झाली. विरोधकांच्या बैठकीमध्ये (Opposition Parties Meeting) महाराष्ट्रातून शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित होते. तर दिल्लीत झालेल्या बैठकीला (NDA Meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pawar) उपस्थित होते. याच दरम्यान, महाराष्ट्रातील या दोन नेत्यांना एनडीएच्या बैठकीत (NDA Meeting) कुठे स्थान देण्यात आले याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

दिल्लीमधील अशोका हॉटेलमध्ये (Ashoka Hotel) एनडीएची बैठक (NDA Meeting) बोलवण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President J.P. Nadda) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (National Democratic Alliance (NDA) बैठकीला देशभरातील 38 पक्षांचे प्रमुख उपस्थित आहेत. यावेळी या सर्व पक्षांच्या प्रमुखांनी मिळून नरेंद्र मोदी यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. एनडीएच्या आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या (Shivsena) वतीने तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष (NCP National President) या नात्याने उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोदी आणि अमित शाह (Amit Shah)
यांनी आपल्याच रांगेत बसविले आहे.
अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांना बसवले आहे.
शिंदे यांच्या बाजूला जे.पी. नड्डा आणि त्यांच्या बाजूला नरेंद्र मोदी बसलेले आहेत. त्यामुळे आजच्या एनडीएच्या बैठकीत शिवसेना जुना मित्र पक्ष असला तरी नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांना दिल्लीत मानाचे स्थान देण्यात आले.

 

 

 

Web Title : NDA Meeting | ajit-pawar-eknath-shinde-in-nda-meeting-with-pm-modi-amit-shah-the-first-photo-came-out

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा