Namo Chashak 2024 In Pune | तरुणांना व्यायामाचे महत्व पटविण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धे सारखे क्रीडा प्रकार उपयुक्त – चंद्रकांत पाटील

नमो चषक अंतर्गत शरीर सौष्ठव स्पर्धेत गणेश बनकर कोथरूड श्री विजेता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Namo Chashak 2024 In Pune | तरुणांना व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धेसारखे क्रीडा प्रकार उपयुक्त असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता आपल्या शरीराकडे लक्ष द्यावे व निरोगी आयुष्य जगावे यासाठी नमो चषक अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या असल्याचे ही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

नमो चषक अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात “कोथरूड श्री” ह्या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी भाजयुमो चे क्रीडा आघाडी चे शहर प्रमुख प्रतीक खर्डेकर (Pratik Khardekar) आणि पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नांगरे (Rajendra Nagre) यांचा विशेष सत्कार केला व तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करणार असल्याचेही जाहीर केले.

यावेळी भाजप चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, कोथरूड मंडल भाजपा अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सरचिटणीस गिरीश खत्री, दीपक पवार, भाजप नेते धनंजय जाधव, कामगार आघाडीचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब टेमकर, युवा मोर्चा चे कोथरूड मंडल अध्यक्ष अमित तोरडमल, क्रीडा आघाडी चे योगेश कंठाळे, अनिश अगरवाल, मंडल उपाध्यक्ष शंतनू खिलारे, राजेंद्र येडे, नितीश बराटे,सुमित दिकोंडा, स्वप्नील राजवाडे, सायंदेव देहाडराय, सूचित देशपांडे यांच्यासह महिला मोर्चा प्रभारी व कोथरूड च्या सरचिटणीस मंजुश्री खर्डेकर, महिला मोर्चा अध्यक्ष कांचन कुंबरे,महिला मोर्चा सरचिटणीस विद्याताई टेमकर,पल्लवी गाडगीळ,सुप्रिया माझीरे,उपाध्यक्ष कल्याणी खर्डेकर, कविता सदाशिवे इ मान्यवर उपस्थित होते. उत्तरोत्तर रंगलेल्या ह्या स्पर्धेस नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.(Namo Chashak 2024 In Pune)

“कोथरूड श्री” हा मुख्य किताब वर्ल्ड जिम च्या गणेश बनकर ने पटकवला तर मोस्ट इम्परुव्हडं बॉडी बिल्डर चा
विजेता मोहम्मद एहराज ठरला,बेस्ट पोझर चा विजेता ठरला अतुल साळुंके तर अतिक शेख ने अप कमिंग बॉडी बिल्डर
चा ‘किताब पटकवीला.

राजेंद्र नांगरे, नंदू कळमकर,मुस्तफा पटेल,दिलीप धुमाळ आणि सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष
परिश्रम घेतले. स्पर्धा संयोजन प्रतीक खर्डेकर यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | पिंपरी : ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने जिम ट्रेनरला 35 लाखांचा गंडा

CM Eknath Shinde | ”लिमीटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच मी…”, नाना पटोलेंशी बोलतानाचा मुख्यमंत्र्याचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Pune Dhayari Crime | कामगारांचे पैसे देण्यास उशीर केल्याने तरुणाला मारहाण, धायरी परिसरातील घटना