झेब्रा क्रॉसिंग-पोस्टर पेंट करत होते नाना पाटेकर, असे निर्माण केले इंडस्ट्रीत स्थान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाची पताका फडकावणारे अभिनेते नाना पाटेकर फिल्म इंडस्ट्रीत त्या अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्यांना जनतेकडून अलोट प्रेम आणि सन्मान मिळत आला आहे. नानाचे असंख्य चाहते आहेत. त्यांच्या अभिनयाची जादू अशी आहे की, प्रत्येकजण त्यांचा चाहता होतो. सोबतच नाना पाटेकर त्या अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी बॉलीवुडच्या अनेक रूढी तोडल्या. स्वत: नाना पाटेकर यांनी एक मुलाखतीमध्ये सांगितले होते की, सावळा रंग असल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. मात्र एक सत्य हे देखील आहे की, नाना पाटेकर यांच्या अभिनयामुळेच जनतेने त्यांना केवळ स्वीकारले नाही तर आपल्या हृदयात सुद्धा स्थान दिले. या अभिनेत्याच्या जन्मदिनी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा अनेक बाजू ज्या तुम्हाला माहित नसतील…

नाना पाटेकर यांचा जन्म मुंबईत कुलाबा येथे 1 जानेवारी 1951 ला झाला होता. त्यांनी वयाची 70 वर्ष पूर्ण केली आहेत. आजही ते चित्रपटांमध्ये काम करणे पसंत करतात. परंतु नाना आता चित्रपटांमध्ये कमी दिसतात. नाना पाटेकर यांचे बालपण गरिबीत गेले आहे. त्यांनी आपले करियर अ‍ॅक्टिंगमध्ये सुरू करण्यापूर्वी झेब्रा क्रॉसिंग आणि पोस्टर सुद्धा पेंट केले आहेत. नाना पाटेकर यांचे वडिल त्यांना नाटक पाहण्यासाठी प्रेरित करत असत. नाटक पहात-पहात नानांचे मन यामध्ये रमले आणि त्यांनी चित्रपटांना आपले करियर म्हणून निवडले. जेव्हा नाना पाटेकर 28 वर्षांचे होते तेव्हा हार्टअटॅकने त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. नाना आजसुद्धा आपल्या आईसोबत 1 बीएचके फ्लॅटमध्ये राहतात.

1978 मध्ये गमन चित्रपटातून नाना पाटेकर यांनी आपल्या करियरला सुरूवात केली होती. यानंतर गिद्द, अंकुश, प्रहार, प्रतिघात सारख्या चित्रपटांमधून नानांनी आपल्या अभिनयाद्वारे लोकांचे लक्ष आकर्षित केले. मात्र, ज्या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता दिली तो होता सलाम बॉम्बे. यानंतर प्रहार, दीक्षा, दिशा, राजू बन गया जंटलमन, तिरंगा, क्रांतीवीर, हमदोनो, खामोशी, गुलाम-ए-मुस्तफा, वजूद, कोहराम आणि हूतूतू सारखे चित्रपट करून त्यांनी प्रचंड नाव कमावले.

तडका चित्रपटात दिसणार
2000 नंतरच्या चित्रपटांविषयी बोलायचे तर शक्ती, अब तक छप्पन, वेलकम, अपहरण, ब्लफ मास्टर, यात्रा, राजनीती, शाहगिर्द आणि अटॅक ऑफ 26/11 सारख्या चित्रपटात त्यांनी उल्लेखनीय अभिनय केला. मराठी चित्रपट नटसम्राटमधील त्यांचा अभिनय आजही लोकांच्या स्मरणात आहे. तनुश्री दत्ताने केलेल्या मीटू आरोपानंतर नानांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले होते. काहीकाळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर नाना पाटेकर पुन्हा एकदा चित्रपटात परतले आहेत. ते आता तडका चित्रपटात दिसणार आहेत.