‘ही’ व्यक्ती नाना पाटेकर यांच्या सगळ्यात जवळची, जाणून घ्या

मुंबई, ता. १९ : पोलीसनामा ऑनलाइन : आज मराठी, बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख नाना पाटेकर यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या अग्निसाक्षी, क्रांतीवीर या चित्रपटांनी त्यांना एका विशिष्ठ उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांना आजवरच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या अभिनयाचे अनेक फॅन्स आहेत. आज त्यांनी क्रांतीवीर, वेलकम, परिंदा, अग्निसाक्षी, राजू बन बया जंटलमॅन, तिरंगा, अपहरण यांसारख्या अनेक हिंदी तर नटसम्राट, सिंहासन, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटेः द रिअल हिरो, आपला मानूस यांसारख्या मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

नाना यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत झाले होते. नाना आणि नीलकांती यांनी प्रेमविवाह केला होता. लग्न झाले त्यावेळी नाना २७ वर्षांचे होते. लग्नाच्यावेळी नीलकांती नानांपेक्षा अधिक कमवत होत्या. त्यावेळी त्या बँकेत नोकरीला असून त्यांचा पगार अडीज हजार रुपये होता तर नाना केवळ साडे सातशे रुपये कमवत असत. पण नाना यांना अभिनयाची असलेली आवड नीलकांती यांनी ओळखली होती. नानांच्या करियरमध्ये त्या नेहमीच त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. त्यांच्या पाठिंब्यामुळेच नाना पाटेकर यांना अभिनय क्षेत्रात यश मिळवता आले.

 

 

 

नीलकांती देखील एक अभिनेत्री असून त्यांनी आत्मविश्वास या चित्रपटात काम केले आहे. आत्मविश्वास या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी गोठ या मालिकेत काम केले होते. नीलकांती आणि नाना यांना मल्हार हा मुलगा असून त्याला अनेकवेळा नानांसोबत पाहायला मिळते. नाना यांचा मुलगा त्यांचा जीव की प्राण असून त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये देखील ते त्याच्याविषयी भरभरून बोलताना दिसतात. दरम्यान, बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते.