Nana Patole | ‘ही इंग्रजांची पद्धत, महाराष्ट्र खपवून घेणार नाही’; नाना पटोलेंची मंगलप्रभात लोढांच्या विधानावर टीका, राजीनाम्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – “अगोदर बोलायचं आणि नंतर माफी मागायची अशी इंग्रजांची पद्धत आहे. ही पद्धत महाराष्ट्र खपवून घेणार नाही. एवढंच त्यांना वाटत असेल तर तातडीने राजीनामा द्यावा,” असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कालच्या (30 नोव्हेंबर) वक्तव्याचा निषेध केला आहे. बुधवारी (30 नोव्हेंबर) प्रतापगडावर शिवप्रतापदिनी झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाला शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची उपमा दिली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांनी मंगलप्रभात लोढांवर टीका केल्यानंतर काँग्रेसलाही जाग आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेत लोढांनी केलेल्या विधानावर टीका केली.

शिवप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले होते. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. तिथे बोलताना भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानामुळे विरोधी पक्षनेत्यांकडून जोरदार टीका होत आहे. शिवप्रतापदिनी प्रतापगडावर मंगल प्रभात लोंढा म्हणाले, “शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले, तर शिंदे महाराष्ट्रासाठी.”

यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “मुद्दा असा आहे की यांची
(मंगलप्रभात लोढा) जीभ वळते कशी? फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल
असं वक्तव्य करण्यासाठी यांची जीभ कशी वळते? यांनी माफी मागावी.
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत यायचं आणि नंतर त्यांचाच अवमान करायचा,
हा भाजपला कोणी अधिकार दिला. हा प्रश्न या राज्यातील जनता आणि काँग्रेस विचारते आहे.
अगोदर बोलायचं आणि नंतर माफी मागायची अशी इंग्रजांची पद्धत आहे. ही पद्धत महाराष्ट्र खपवून घेणार नाही. एवढंच त्यांना (मंगलप्रभात लोढा) वाटत असेल तर तातडीने राजीनामा द्यावा. अशी भूमिका आमची आहे, यांना माफी नाही.” लोढांच्या राजीनाम्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे. याशिवाय, शिवाजी महाराजांच्या विचारांत गद्दारांना कधीच माफी नव्हती, महाराष्ट्रातील जनता हीच भूमिका घेऊन लढत आहे. या भावना जर भाजपने लक्षात घेतल्या नाहीत, तर त्यांना निश्चितच महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याखेरीज राहणार नाही, असेही ते म्हणाले.

Web Title :- Nana Patole | congress state president nana patoles criticism of mangalprabhat lodhas statement about chhatrapati shivaji maharaj

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aditya Thackeray | मंगलप्रभात लोढांच्या विधानाची टीका करणाऱ्यांमध्ये आदित्य ठाकरेंची भर; ट्विटद्वारे म्हणाले, “गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं म्हणजे…”

Shweta Tiwari | श्वेता तिवारीने ‘तो’ फोटो शेअर करताच नेटकरी संतापले; म्हणाले लाज वाटते का…..

Raj Thackeray | ‘आतापर्यंतची आपण ऐकलेली ती सर्व काल्पनिक नावं आहेत’; ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबद्दल राज ठाकरेंनी दिलेली माहिती शरद पवारांना मान्य?