मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनासाठी अमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन १७ व्या दिवशी उपोषण सोडल्यानंतर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. पटोले यांनी म्हटले आहे की, जरांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीच उपोषणाला बसवले होते.
नाना पटोले यांनी म्हटले की, जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होते. ३१ तारखेच्या मध्यरात्री आंदोलक संतप्त झाले. मात्र १ तारखेला तीन वाजता सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. याच दिवशी मुंबईत इंडिया आघाडीची (INDIA Aghadi Meeting) बैठक सुरु होती. या बैठकीवरुन लक्ष वळवण्यासाठीच लाठीचार्जची घटना घडवली गेली. (Nana Patole)
पटोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना उपोषणाला बसवले होते हे आता सिद्ध झाले आहे. कारण सौम्य लाठीचार्ज झाला आणि फडणवीसांनी माफी सुद्धा मागितली. दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम सरकार करत आहे.
पटोले म्हणाले, काँग्रेसची आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका आहे. जे मागास आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे.
कोणाच्या तोंडचा घास हिरावून नको, तर जातीनिहाय जनगणना करुन मिळाले पाहिजे. ओबीसींना २७ टक्के तसेच मराठा, धनगर यांना पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून पुढे आरक्षण दिले पाहिजे.
दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणावरून पटोले यांनी केलेल्या या खळबळजनक आरोपामुळे नवा वाद
निर्माण होण्याची शक्यता आहे. पटोले यांनी थेट उपोषणकर्त्यांवरच प्रश्न उपस्थित केला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Devendra Fadnavis On Sunil Kendrekars Farmer Suicides Reports | शेतकरी आत्महत्यांबद्दल
केंद्रेकर यांच्या अहवालावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘त्यांची सामिती…’
Ganeshotsav 2023 | मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन –
पर्यटन मंत्री गिरीश महाजन
Ajit Pawar On Maharashtra Govt Ministers | अजित पवारांनी मंत्र्यांना सुनावले खडेबोल,
कामे पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची, मंत्रिपदे नुसती…