Devendra Fadnavis On Sunil Kendrekars Farmer Suicides Reports | शेतकरी आत्महत्यांबद्दल केंद्रेकर यांच्या अहवालावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘त्यांची सामिती…’

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Sunil Kendrekars Farmer Suicides Reports | राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मराठवाड्यातील संभाजीनगरात पार पडली (Marathwada Cabinet Meeting). या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी ४५ हजार कोटींच्या निधीची घोषणा केली. दरम्यान शेतकरी आत्महत्यांबाबत माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सादर केलेल्या अहवालाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत मोठे वक्तव्य केले. (Devendra Fadnavis On Sunil Kendrekars Farmer Suicides Reports)

या अहवालाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रेकर यांचा अहवाल मी पाहिला. त्यांची समिती अधिकृत नव्हती. त्यांनी चांगले काम केले. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जी मते त्यांनी नोदवली आहेत, त्याचा आम्ही नक्की विचार करणार आहोत. आजच्या बैठकीत मराठवाड्यासाठी ज्याकाही उपायोजना मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्या, त्या शेतकरी आत्महत्या रोखण्याशी संबंधीतच आहेत. दुधाळ जनावरे देणे ही उपायोजना आहे. मराठवाड्यातील सर्व गावांचा त्यामध्ये समावेश करणार आहोत. (Devendra Fadnavis On Sunil Kendrekars Farmer Suicides Reports)

अहवालासाठी कसा केला अभ्यास

दुष्काळग्रस्त मराठवाडा शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखला जातो. येथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे केलेले सर्व प्रयत्न कुचकामी ठरलेत. केंद्रेकर यांनी या संदर्भातील अहवाल तयार करण्यासाठी १०४ प्रश्नांचा समावेश असलेला एक अर्ज तयार केला होता. त्याचा वापर करून सर्वे करण्यात आला. यासाठी १० लाख शेतकऱ्यांचा अभ्यास करण्यात आल्याचे समजते.

अहवालात नमूद केलंय धक्कादायक वास्तव

या अहवालाच्या सर्व्हेतील वर्गवारीनूसार १ लाखाहून जास्त शेतकरी आत्महत्येच्या विचारात असल्याचे नमूद केलंय. तर तब्बल तीन लाख शेतकरी अहवालाच्या संवेदनशील यादीत आहेत. पेरणीसाठी काढावे लागणारे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न, शेतमालाचे नुकसान या सगळ्याच गोष्टी शेतकरी आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्याचे यात म्हटले आहे.

केंद्रेकर यांनी हा अहवाल स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याच्या दोन दिवस आधी सरकारला सादर केला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘परदेशी गुंतवणूक कमी होण्यास…’

MNS Likely To Contest Pune Lok Sabha | मनसे लढवणार आगामी लोकसभा; पुणे मतदारसंघासाठी
उमेदवाराचा शोध सुरू

Keshav Upadhye Criticizes INDIA Aghadi And Congress | वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवरील
बहिष्कार ही घमंडिया आघाडीची हुकूमशाही

Ganeshotsav 2023 | मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन –
पर्यटन मंत्री गिरीश महाजन

Devendra Fadnavis – Dr Syama Prasad Mukherjee Award | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार