Ajit Pawar On Maharashtra Govt Ministers | अजित पवारांनी मंत्र्यांना सुनावले खडेबोल, कामे पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची, मंत्रिपदे नुसती…

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Maharashtra Govt Ministers | राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आज संभाजी नगरमध्ये पार पडली (Marathwada Cabinet Meeting). या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी विविध विकास कामांची घोषणा केली आहे. तसेच ४५ हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामे पूर्ण करण्याबाबत आणि नियमित आढावा घेण्याबाबत पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देत खडेबोल सुनावले. (Ajit Pawar On Maharashtra Govt Ministers )

ते वंदे मातरम सभागृहात महापालिकेच्या विविध विकास योजनांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. अजित पवार म्हणाले, आजच्या बैठकीत मंजुर होणारी कामे भविष्यात होतात किंवा नाही हे पाहणे संबंधित पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करावा. मंत्रीपद हे केवळ मिरवण्यासाठी नाही. (Ajit Pawar On Maharashtra Govt Ministers )

अजित पवार म्हणाले, मराठवाड्याला यंदा चांगली मंत्रिपदे मिळाली आहेत. मात्र, मंत्रिपदे नुसती भुषवायची नसतात. मंत्रिपदाचा फायदा घ्या. माझी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी योजनांचा दर आठवड्याला आढावा घेतला पाहीजे. सरकार मराठवाड्यासाठी योजना जाहीर करते. मात्र, नंतर त्या योजनांचे कामच पूर्ण होत नसल्याचे दिसते.

मराठवाड्यातील मंत्र्यांना सल्ला देताना पवार म्हणाले, सरकार ज्या योजना जाहीर करेल, त्या योजनांचे काय झाले, याची दर आठवड्याला पालकमंत्र्यांनी माहिती घेतली पाहीजे. आढावा बैठक घेतली पाहीजे. काम कुठपर्यंत आले आहे, कुठे रखडले आहे, याची माहिती घ्यावी.

काही अडचणी असतील तर मुख्यमंत्री कार्यालय किंवा उपमुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला पाहीजे.
तेथून समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहीजे. असे केले तरच योजना पूर्णत्वास जावू शकतात.
तसेच सकाळी लवकर उठून कामाला लागा, लोक येतात, असे पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘परदेशी गुंतवणूक कमी होण्यास…’

MNS Likely To Contest Pune Lok Sabha | मनसे लढवणार आगामी लोकसभा; पुणे मतदारसंघासाठी
उमेदवाराचा शोध सुरू

Keshav Upadhye Criticizes INDIA Aghadi And Congress | वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवरील
बहिष्कार ही घमंडिया आघाडीची हुकूमशाही

CM Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांची टीका,
म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र क्रमांक एकवर आणला होता, पण…’

Marathwada Cabinet Meeting | मराडवाड्यासाठी ४५ हजार कोटींचा निधी; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा